घरमहाराष्ट्रपुणेPune News: तपमानाचा पारा वाढला; पुणेकरांना उन्हाचा तडाखा

Pune News: तपमानाचा पारा वाढला; पुणेकरांना उन्हाचा तडाखा

Subscribe

पुणे: मागच्या दोन दिवसांपासून पुणे शहर आणि जिल्ह्याच्या तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. हवामान बदलामुळे पुणे शहर आणि जिल्ह्याच्या तपमानात वाढ झाली आहे. बुधवारी पुणे शहराचे तापमान 18 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले होते. पुण्यात बुधवारी 18.1 अंश सेल्सिअस इतक्या तपमानाची नोंद झाली आहे. गेल्या दोन दिवसांत पुण्यातून थंडी गायब झाली आहे. पुणेकरांना उन्हाचे चटके सोसावे लागत आहेत. (Pune News Temperature rises Pune residents are hit by the heat)

पुण्यात 2014 ते 2024 या दहा वर्षांमध्ये फक्त सात वेळा किमान तपमानानाने 18 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त उसळी मारली आहे. यात या दशकातील फेब्रुवारीमध्ये सर्वाधिक किमान तपमान 20 फेब्रुवारी 2016 रोजी 20.25 अंश सेल्सिअस नोंदले गेले. हे या दशकातील फेब्रुवारीमधील उच्चांकी किमान तपमान आहे. त्याआधी 21 फेब्रुवारी 2016 मध्ये 19.5 आणि 22 फेब्रुवारी 2019 मध्ये 19.2 अंश सेल्सिअस तपमानाची नोंद झाली. त्यानंतर गेली चार वर्षे किमान तपमानाचा पारा 17.5 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवला गेला नव्हता. 2020 मध्ये 17.2, 2021 मध्ये 16.7, 2022 मध्ये 15.9 आणि 2023 मध्ये 14.8 अंश सेल्सिअस इतके फेब्रुवारीमधील उच्चांकी किमान तपमान होते. त्यानंतर या वर्षी सलग दोन दिवस किमान तपमानाचा पारा 18 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवला गेला. त्यामुळे पुण्यात रात्रीचा उकाडा वाढत आहे, अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली.

- Advertisement -

अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान

पश्चिम विदर्भातील अमरावती, बुलढाणा, वाशिमसह मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना तसंच उत्तर महाराष्ट्रात जळगाव या जिल्ह्यांना सोमवारी रात्रीपासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा तडाखा बसला. वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालं असून काढणीला आलेलं रब्बीचं पीक हाताततून जाण्याची भीती आहे.

फेब्रुवारीमधील उच्चांकी किमान तापमान ( अंश सेल्सिअसमध्ये)

  • 29 फेब्रुवारी 2016 20.5
  • 21 फेब्रुवारी 2016 19.5
  • 22 फेब्रुवारी 2019 19.2
  • 22 फेब्रुवारी 2016 18.8
  • 17, 18 फेब्रुवारी 2014 18.6
  • 27 फेब्रुवारी 2024 18.2
  • 28 फेब्रुवारी 2024 18.1

(हेही वाचा: Maharashtra Budget : रोहित पवारांवर राम कदमांचे गंभीर आरोप, योगेश सावंत प्रकरणाने विधानसभेत गोंधळ)

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -