घरमुंबईठाण्यातील 'या' परिसरात बुधवारी होणार पाणीकपात

ठाण्यातील ‘या’ परिसरात बुधवारी होणार पाणीकपात

Subscribe

ठाणे शहरातील घोडबंदर रोड, पातलीपाड़ा, पवार नगर, कोठारीकम्पाऊन्ड आणि गांधीनगर या ठिकाणी १९ डिसेंबर रोजी पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

स्टेम वॉटर डिस्ट्री अँण्ड इन्फ्रा कंपनी यांनी पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेला स्टेम कडून होणारा पाणी पुरवठा १९ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते २० डिसेंबर रोजी सकाळी ९ पर्यंत बंद राहणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठ्याचे नियोजन १९ डिसेंबर रोजी सकाळी ९ पासून २० डिसेंबर रोडी सकाळी ९ पर्यंत सुरु रहाणार आहे. यादरम्यान पाणी कपात करण्यात येणार आहे

या भागात पाणी पुरवठा बंद राहणार

ठाण्यातील अनेक भागात बुधवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. ठाणे शहरातील घोडबंदर रोड, पातलीपाड़ा, पवार नगर, कोठारीकम्पाऊन्ड, गांधीनगर, इंदिरानगर, श्रीनगर, लोकमान्यनगर, समतानगर, ऋतूपार्क, सिद्धेश्वर, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, मुंब्रा-कोळीवाडा, शैलेशनगर, संजय नगर आणि कळव्याचा काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

पाण्यासाठी नागरिकांची वणवण

राज्यात दुष्काळ जन परिस्थीती असल्यामुळे अजूनही काही भागात पाणी नसल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत असल्याचे दिसून येत आहे. बऱ्याच ठिकाणी अक्षरश: टॅंकरने पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे अनेक नागरिकांची टँकरवर झुंबड पडलेली देखील दिसून येते.

दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार

ठाणे शहरात शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा योग्यतो वापर करणे गरचेचे असून ठाणे महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -