मुख्यमंत्री शिंदे, प्रताप सरनाईकांच्या वादावर पूर्वेश सरनाईक ट्वीट करत म्हणाले… ‘दो दिल’

purvesh sarnaik rejects media report on rift between cm eknath shinde and pratap sarnaik

ठाण्यातील एका मतदारसंघावरून आमदार प्रताप सरनाईक आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात वादाची ठिणगी पडल्याच्या बातम्या समोर येत आहेत. ज्यावरून आता अनेक राजकीय चर्चा देखील रंगत आहेत. यात आता आमदार प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक यांनी ट्विट करत चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. ‘दो दिल और एक जान है हम्म..’ असा मेसेज पूर्वेश सरनाईक यांनी ट्विट केला आहे. यावर पूर्वेश सरनाईकांना संबंधीत बातम्यांबाबत विचारण्यात आले मात्र सर्व बातम्या खोट्या असल्याचं त्यांनी सांगितले. तर आमदार प्रताप सरनाईकांनी यावर बोलण्यास नकार दिला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्यात ठाण्यातील ओवळा माजिवाडा मतदार संघातील आमदारकी सोडण्यावरून वाद झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. ठाण्यातील हा मतदार संघ शिवसेनेचा असून प्रताप सरनाईक या मतदार संघाचे आमदार आहेत. यामुळे प्रताप सरनाईकांनी हा मतदारसंघ सोडावा आणि तो भाजपला द्यावा अशी मुख्यमंत्री शिंदेंची मागणी आहे. यावरूनचं आमदार प्रताप सरनाईक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात वाद सुरु असल्याची बातमी समोर येत आहेत. मात्र ही बातमी फसवी असल्याची माहिती प्रताप सरनाईक यांचे पुत्र माजी नगरसेवक पूर्वेश सरनाईक यांनी दिली आहे. त्याचबरोबर पूर्वेश यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांचा फोटो पोस्ट करत त्यावर !! दो दिल और एक जान है हम !! अशी कॅप्शन दिली आहे. मात्र यावर प्रताप सरनाईकांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

प्रताप सरनाईक यांनी आपला ठाण्यातील ओवळा माजिवाडा मतदारसंघ भाजपच्या माजी आमदारासाठी सोडावा, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्न करत आहेत. मात्र यावरूनचं मुख्यमंत्री शिंदे आणि प्रताप सरनाईकांमध्ये खडाजंगी सुरु आहे. सरनाईकांना त्यांचा ओवळा माजीवाडा मतदारसंघ भाजपच्या माजी आमदाराला देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्नशील असल्याची बातमी कळताच सरनाईकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करत संवाद साधला. यावेळी फोनवरील संभाषणादरम्यान मुख्यमंत्री शिंदे आणि सरनाईकांमध्ये शाब्दिक वाद झाल्याची माहिती समोर येत आहे. ज्यावरूनचं आता माध्यमांमध्येही बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि या विषयावर एकचं चर्चा सुरु आहे.

प्रताप सरनाईक सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेसमधून नगरसेवक म्हणून निवडूण आले. यानंतर 2008 ला त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर लगेचच 2009 मध्ये प्रताप सरनाईकांनी ठाण्यातील ओवळा माजीवाडा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढली आणि ते आमदार म्हणून जिंकूनही आले. यानंतर याच मतदारसंघातून ते 2009, 2014 आणि 2019 मध्ये सलग तीनवेळा आमदार म्हणून निवडून आले. ठाणे महापालिका आणि मीरा भाईंदर महापालिकेचा काही भागही यात मतदारसंघात येतो. एकूण या भागात प्रताप सरनाईकांची मजबूत पकड आहे. मात्र शिंदेंच्या प्रयत्नांनंतर प्रताप सरनाईकांकडून खरचं ओवळा- माजीवाडा मतदारसंघ जातोय का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


शहाडची पाणीयोजना उल्हासनगर महापालिकेकडे होणार हस्तांतरीत