घरमहाराष्ट्रRain Update : पुढचे ४८ तास राज्यासाठी महत्त्वाचे, 'या' जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा...

Rain Update : पुढचे ४८ तास राज्यासाठी महत्त्वाचे, ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज

Subscribe

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, कोकण, पालघर, मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार तर विदर्भातील अनेक भागांत जोरदार पावसाची नोंद झाली आहे. अशातच राज्यात पुढील ४८ तास मुसळधार पाऊसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर पालघर, रायगड, रत्नागिरी या भागांमध्ये हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्य़ामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यासाठी पावसासाठी पुढील २ दिवस अधिक महत्त्वाचे आहेत. या जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासांत वेगवान वाऱ्यांसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्व राज्यांमध्ये तर २२ ते २६ सप्टेंबर या दरम्यान राज्यात सर्वत्र पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे राज्याभरात पावसाची संततधार पुढील काही दिवस कायम राहणार आहे.

मराठवाडा, कोकण आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाच्या हलक्या आणि मध्यम सरी कोसळणार आहेत. विदर्भात पुढील चार दिवस बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे.

- Advertisement -

मुंबई, पालघर ठाण्यात मुसळधार

मुंबईसह ठाणे भिवंडी, बदलापूर, कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर आणि डोंबिवली पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने आज जोरदार हजेरी लावली. वाऱ्यासह पडणाऱ्या पावसामुळे संपूर्ण परिसरात गारवा निर्माण झाला आहे. पालघर जिल्ह्यातही सलग तिसऱ्या तीन दिवस पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पालघर, चिंचणी, जव्हार, मोखाडा, डहाणू भागात जोरदार पाऊस झोडपून काढले आहे.

वसई, विरार, नालासोपारामध्ये रिमझिम

वसई, विरार, नालासोपारामध्ये पावसाची संततधार सुरु आहे. सतत रिमझिम बरसणाऱ्या पावासमुळे याठिकाणी काळेकुट आभाळ भरून आवे आहे. या भागात आज दिवसभर जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

राज्यात पावसाचा अंदाज 

ऑरेंज अलर्ट असलेले जिल्हे ( २२ सप्टेंबर)

पालघर, रायगड, रत्नागिरी

मुसळधार पाऊसाचा इशारा असलेले जिल्हे ( २२ -२३ सप्टेंबर )

मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ

मध्यम आणि हलक्या पावसाच्या सरी (२४ -२५ सप्टेंबर)

पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, बुलढाणा वगळता उर्वरित महाराष्ट्रात मध्यम आणि हलक्या पावसाच्या सरी कोसळणार आहेत.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -