घरताज्या घडामोडी५० लाखांच्या घोटाळ्यात ईडीच्या नोटीसवर तुम्ही हैराण झाला, चंद्रकांत पाटलांचा राऊतांवर पलटवार

५० लाखांच्या घोटाळ्यात ईडीच्या नोटीसवर तुम्ही हैराण झाला, चंद्रकांत पाटलांचा राऊतांवर पलटवार

Subscribe

पीएमसी बँक घोटाळ्यावेळी ५० लाख रुपयांसाठी तुमची झालेली धावपळ बघून मी अंदाज बांधला - चंद्रकांत पाटील

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती. संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर चंद्रकांत पाटील यांनी पत्र लिहून दिले होते. तेच पत्र संजय राऊत यांनी सामना अग्रलेखात छापले होते. पीएमसी बँक घोटाळ्यामध्ये ५० लाख रुपयांसाठी ईडीने नोटीस बजावल्यावर संजय राऊत हैराण झाले होते. तेव्हाच कळालं ५० लाखांसाठी एवढा त्रास होत असेल तर १२७ कोटी रुपयांसाठी नक्कीच फेस येईल असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच संजय राऊत हे सातत्याने माझ्यावर टिका करून मला भरपूर प्रसिद्धी मिळवून देत असतात असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान संजय राऊत हे शिवसेनेचे नुकसान करत असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रातून संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. यामध्ये चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की, संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून माझ्यावर चिखलफेक केली. पण त्यांना उत्तर देणे प्रोटोकॉलनुसार योग्य ठरणार नाही म्हणजेच राजकीयदृष्ट्या बरोबर नाही. ज्याला पाठीत खंजीर खुपसणे म्हणजेच विश्वासघात करणे एवढाही अर्थ माहित नाही त्यासाठी प्रोटोकॉल हा शब्द वापरला. मी महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या पक्षाचा अध्यक्ष आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी माझ्यावर टिका केली असती तर मी त्याला उत्तर देणे बरोबरीचे झाले असते. ते राजकारणातील प्रोटोकॉल धरून झाले असते. पण राऊतांच्याबाबतीत तसे नाही. असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

ईडीच्या कारवाईत तोंडाला फेस

मुश्रीफांची बाजू घेताना ‘पाटील यांना ईडीचा अनुभव कधीपासून आला? असा सवाल तुम्ही केलात. संजयराव तुमचा प्रश्न रास्त आहे. मला ईडीचा अनुभव नाही किबंहुना तो येण्यासाठी भरपूर काळा पैसा असावा लागतो. परंतु पीएमसी बँक घोटाळ्यावेळी ५० लाख रुपयांसाठी तुमची झालेली धावपळ बघून मी अंदाज बांधला जर ५० लाख रुपयांसाठी एवढा त्रास असेल तर १२७ कोटींसाठी नक्कीच फेस येईल, असे त्रैराशिक मांडून मी अंदाज बांधला असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

राऊतांना शिवसेनेचा विसर

संजय राऊत यांनी कोल्हापूरातुन पळ काढून निवडणुक जिंकण्यासाठी तोंडाला फेस आला होता अशी टीका केली होती. तसेच कोल्हापूरमध्ये भाजपचा सुपडा साफ झाल्याची टीकाही केली होती. यावर चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की, तुम्ही म्हणालात हसन मुश्रीफांसारख्या पैलवानामुळे कोल्हापुरातून भाजपाचा सुफडा साफ झाला वैगरे. परंतु तुम्ही विसरलात मागील विधानसभा निवडणूक शिवसेना भाजपा युतीत लढले. कोल्हापूर जिल्ह्यात ६ पैकी ५ जागांवर शिवसेना पराभूत झाली आणि एकच आमदार उरला. हे केवळ मी तुमच्या माहितीसाठी सांगितले. कारण सध्या तुम्हाला शिवसेनेचा विसर पडला असून राष्ट्रवादीची चांगली माहिती असते. संजय राऊत हे सातत्याने माझ्यावर टिका करून मला भरपूर प्रसिद्धी मिळवून देत असतात.राजकारणात ‘निगेटिव्ह पब्लिसिटी’चाही उपयोग असतो.फक्त तशी टिका योग्य ठिकाणांहून व्हावी लागते.सज्जनांनी टिका केली की धोका असतो राऊतांसारख्यांच्या टिकेचा फायदाच होतो.


हेही वाचा : संजय राऊतांनी सव्वा रुपयांची किंमत वाढवावी, चंद्रकांत पाटील यांचे प्रत्युत्तर


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -