घरमहाराष्ट्रआरबीआयचा अहवाल संसदेत ठेवा; उद्धव ठाकरेंचे खासदारांना आदेश

आरबीआयचा अहवाल संसदेत ठेवा; उद्धव ठाकरेंचे खासदारांना आदेश

Subscribe

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या २०१७-१८ च्या वार्षिक अहवालात ९९.३० टक्के नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. या फसलेल्या नोटबंदी नंतर १५ लाख ३१ हजार कोटी रुपयांच्या नोटा परत आल्या असून नोटबंदी पुर्णपणे फसली आहे. यासंबंधीचा अहवाल आरबीआयने आज जाहीर केला आहे. तो अहवाल सरकारला लोकसभेच्या पटलावर मांडण्यास भाग पाडा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या खासदारांना दिले आहेत.

नोटबंदी हा मोदी सरकारचा ‘माष्टरस्ट्रोक’ म्हणत जी काही हवा भाजप सरकारने केली होती. तो वास्तविक मोदी सरकारचा फुसका बार असल्याचे अहवालातून उघड झाले आहे. रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार नोटाबंदीचा निर्णय फसल्याचे पोलखोलच झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार नोटबंदी या विषयावर अक्षरशः तोंडघशी पडले आहे. नोटबंदीच्या निर्णयावर सरकारची भूमिका स्पष्ट झाली पाहिजे, यासाठी नोटबंदी संदर्भात आलेला अहवाल संसदेत पटलावर मांडायला भाग पाडा, असे आदेशच शिवसेना खासदारांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

आमचा ईव्हीएमला आधीपासूनच विरोध – अरविंद सावंत

शिवसेनेच्या विदर्भातील पदाधिकारी आणि आमदार, खासदार यांच्यासहीत १० जिल्यांची आज बैठक घेण्यात आली. या बैठकीला आनंदराव अडसूळ, अनिल देसाई, शिशिर शिंदे आणि अरविंद सावंत उपस्थित होते. राज ठाकरे यांनी पाठवलेल्या पत्राबद्दल विचारले असता खासदार अरविंद सावंत म्हणाले की, शिवसेनेने आधीपासूनच ईव्हीएम मशीनचा विरोध केला आहे. तसेच याचा विरोध आम्ही कायम करत राहणार आहोत, असे सांगत राज ठाकरे यांच्या पत्राबद्दल सविस्तर बोलण्यास टाळले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -