घरमहाराष्ट्रमोदींना आता कोणत्या चौकात शिक्षा द्यायची; लोकांनी ठरवावे - राज ठाकरे

मोदींना आता कोणत्या चौकात शिक्षा द्यायची; लोकांनी ठरवावे – राज ठाकरे

Subscribe

पंतप्रधान नरेंद मोदी यांचा नोटबंदीचा निर्णय फसला आहे, आता जनतेनेच ठरवावे की मोदींना कोणत्या चौकात शिक्षा द्यायची, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले.

आरबीआयच्या अहवालातून नोटबंदीचा निर्णय फसला हे समोर आले आहे. त्यामुळे लोकांनीच मोदींना पत्र लिहून चौकात बोलावले पाहीजे, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. दोन वर्षांपूर्वी नोटबंदीचा निर्णय घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला फक्त ५० दिवस द्या आणि मग बघा काय होतं ते? ५० दिवसानंतर माझा निर्णय चुकला तर मग तुम्ही सांगाल त्या चौकात मी शिक्षा भोगायला तयार आहे, असे मोदींनी सांगितले होते. हाच धागा पकडत ठाकरे यांनी मोदींवर निशाना साधला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे सध्या संघटनबांधणीसाठी महाराष्ट्र दौरा करत आहेत. प्रत्येक ठिकाणी ते भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळ दौऱ्यावर गेले आहेत. यावर भाष्य करताना ठाकरे म्हणाले की, नेपाळमध्ये थापा आहेत म्हणून मोदी तिकडे गेले असावेत.

- Advertisement -

वन नेशन, वन वोट – हा भाजपचाच अट्टाहास

काल केंद्रीय विधी आयोगाने आपल्या अहवालात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्यासंबंधी सकारात्मक अहवाल दिला आहे. राजस्थान राज्यात पराभव दिसू लागल्यामुळे कदाचित दोन्ही निवडणुका एकत्र घेण्याची खेळी भाजप करत आहे.

ईव्हीएम नकोच

ईव्हीएम मशीन हटवावी याबाबत मी सर्वच राजकीय पक्षांना पत्र लिहिले आहे. प्रामुख्याने शरद पवार यांच्याशी प्रत्यक्ष भेटून या विषयावर चर्चा केली आहे. ईव्हीएमवरची विश्वासार्हता संपली आहे. त्यामुळे व्हीव्हीपेड असेल तर निवडणूकीसंदर्भात निर्णय घेण्यात यावा. अन्यथा पेपर बेलेट निवडणूका झाल्या पाहिजे, अशी भूमिका राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडेही मांडली आहे.

- Advertisement -

अधिक वाचा – ईव्हीएम मशीन बंदीवर राज ठाकरेचं उद्धव ठाकरेंना पत्र

माझी ब्ल्यू प्रिंट कुणी वाचलीच नाही

बीड येथील पत्रकार परिषदेत राज ठाकरे ग्रामीण भागातील प्रश्नावर आक्रमक दिसत नसल्याचे खोचक प्रश्न विचारले गेले. यावर राज ठाकरे चांगलेच उखडले. शेती हा एकमेव ग्रामीण भागातील प्रश्न आहे का? इतर रोजगाराचा प्रश्न होऊ शकत नाही का? असा प्रतिप्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला.
माझ्या पक्षाने ब्ल्यू प्रिंट काढण्याआधी पत्रकार मला खोचकपणे विचारत होते की कुठेय ब्ल्यू प्रिंट? पण जेव्हापासून ब्ल्यू प्रिंट छापली तेव्हापासून ती कुणी वाचली नाही. मी महाराष्ट्राच्या विकासासाठी जो आराखडा दिला आहे, तो तुम्ही वाचला तर तुम्हाला कळेल महाराष्ट्राच्या विकासासाठी मला काय करायचे आहे, असे उत्तर राज ठाकरे यांनी दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -