घरताज्या घडामोडीकिरीट सोमय्यांवर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली, अपशब्दांचा केला वापर

किरीट सोमय्यांवर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली, अपशब्दांचा केला वापर

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर भेट घेणार आहेत. आज दुपारी १ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी ही भेट होणार आहे. या भेटीसाठी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींची परवानगी घेतली का?, असा खोचक सवाल भाजप नेते किरीट सोमय्या उपस्थित केला होता. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची जीभ घसरली. किरीट सोमय्यांवर टीका करत असताना संजय राऊत यांनी अपशब्दांचा वापर केला. ‘हे लोक चु# आहेत. देशाच्या राजकारणात २०२४च्यानंतर असा चु# लोकांना स्थान उरणार नाही,’ असे संजय राऊत आज माध्यमांशी बोलताना म्हणाले.

नक्की काय म्हणाले संजय राऊत?

काही दिवसांपूर्वी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची भेट होणार आहे. याच पार्श्वभूमीवर किरीट सोमय्यांनी या भेटीसाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी सोनिया गांधींची परवानगी घेतली का? असा खोचक सवाल केला होता. याचे उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, ‘किरीट सोमय्या कोण आहे? मला माहित नाही. असे चु# देशात खूप आहेत. अशा चु# लोकांच्या बोलण्यावरून देशाच्या राजकारणासंदर्भात प्रश्न विचारण्यास अर्थ नाही. देशाच्या राजकारणात २०२४नंतर अशा चु# लोकांना नष्ट करेल. देशात असे लोकं राहणार नाहीत. देशाचे राजकारण स्वच्छ होईल, पारदर्शक होईल आणि लोकशाही येईल. १० मार्च तुम्हाला त्याबाबत समजेल.’

- Advertisement -

पुढे राऊत म्हणाले की, ‘एक मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटायला येत आहेत. याची अशा प्रकारे खिल्ली उडवणे, हा मुख्यमंत्री आणि मराठी माणसांचा अपमान आहे. त्यामुळे मी त्यांना चु्# म्हणालो. आणि अशाच लोकांना केंद्र सरकार सुरक्षा देते हा पण महाराष्ट्राचा अपमान आहे.’


हेही वाचा – …तर मला अटक करून दाखवाच, किरीट सोमय्यांचं मुख्यमंत्र्यांना खुलं आव्हान

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -