Homeमहाराष्ट्रRaj Thackeray : पंतप्रधान मोदींना पाठिंबा का? राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितले

Raj Thackeray : पंतप्रधान मोदींना पाठिंबा का? राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितले

Subscribe

लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून जाहीर करण्यात आला आहे. पण त्यांनी पंतप्रधान मोदी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय का घेतला? याबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे.

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांच्या या पाठिंब्यानंतर गेल्या काही दिवसांत त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला आहे. हा संभ्रम दूर करण्यासाठी आज शनिवारी (ता. 13 एप्रिल) राज ठाकरेंनी एमआयजी क्लबमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी अनेक महत्वाच्या विषयांवर भाष्य केले. तर त्यांनी पंतप्रधान मोदी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय का घेतला? हे देखील यावेळी स्पष्ट केले. (Raj Thackeray said reason for supporting PM Narendra Modi)

आज प्रसार माध्यमांसमोर मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्याबाबत गुढीपाडवा मेळाव्यात घोषणा केली होती. तसेच त्या भूमिकेचे विश्लेषणही मी केले होते. भूमिका बदलली असा माझ्यावर आरोप होत आहे. पण 2014 च्या अगोदरची भूमिका निवडून आल्यानंतर जर बदलू शकते, तर मलाही भूमिका बदलणे आवश्यक असते. मी भूमिका बदलली नव्हती तर धोरणांवर टीका केली होती. अर्थात टीका करताना मी त्यामोबदल्यात काही मागितले नव्हते.

हेही वाचा… Lok Sabha Election 2024 : मनसे करणार महायुतीचा प्रचार, राज ठाकरेंची घोषणा

तसेच, पाच वर्षात ज्या चांगल्या गोष्टी झाल्या त्याचे मी स्वागत केले. देशात अनेक विषय प्रलंबित राहिले होते. त्यात राम मंदिराचा विषय राहून गेला होता. आता राम मंदिरासारखा विषय मार्गी लागला आहे. 1992 पासून आतापर्यंत राम मंदिरासाठी अनेक कारसेवकांनी बलिदान दिले आहे. त्यावेळी कारसेवकांना गोळ्या घातल्या गेल्या होत्या. शरयू नदीत त्यांची प्रेते फेकली गेली होती. राम मंदिरासाठी चाललेले हे दीर्घ आंदोलन विसरता येणार आहे. आता राम मंदिरासाठी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असला तरी नरेंद्र मोदी नसते तर राम मंदिर पूर्ण झाले नसते, असे राज ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आले.

मी नरेंद्र मोदी यांच्या काही धोरणांचा विरोधही केला आहे. परंतु त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे पुन्हा एकदा संधी देणे आवश्यक आहे, असे मला वाटले. त्यामुळे पक्षाने महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. आता महाराष्ट्रासाठी आपल्या काही मागण्या आहेत. त्या त्यांच्यापर्यंत जाणार आहेत. महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचा संरक्षण, मराठी भाषेला अभिजात दर्जा हा विषय आहे. ते मार्गी लागतील, असा विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला.

यावेळी वसंत मोरे यांच्याबाबतचा एक प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला. तेव्हा राज ठाकरेंनी कोणतीही प्रतिक्रिया न देता पत्रकाराच्या दिशेने केवळ हात जोडले आणि ते पत्रकार परिषदेतून उठून जाण्यास निघाले. पण यावेळी ते पदाधिकाऱ्यांना बाईट देऊन जा, असे म्हणाले.

हेही वाचा… Sanjay Raut : भ्रष्टाचाराचे शेण खाण्यापेक्षा…, राऊतांची पंतप्रधान मोदींच्या विधानावर सडकून टीका