घरक्राइमWoman Killed Unilateral Lover : मित्राच्या साथीने प्रेयसीने काढला प्रियकराचा काटा

Woman Killed Unilateral Lover : मित्राच्या साथीने प्रेयसीने काढला प्रियकराचा काटा

Subscribe

अनैतिक संबंधाला अढथळा ठरत असल्याने प्रेयसी आणि त्याच्या मित्राने प्रियकराच्या अंगावरून गाडी नेत त्याची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील पुणे-नाशिक महामार्गालगत असलेल्या अयोध्या हॉटेलसमोर ही घटना घडली.

जुन्नर : अनैतिक संबंधाला अढथळा ठरत असल्याने प्रेयसी आणि त्याच्या मित्राने प्रियकराच्या अंगावरून गाडी नेत त्याची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील पुणे-नाशिक महामार्गालगत असलेल्या अयोध्या हॉटेलसमोर ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच नारायणगाव पोलिसांनी प्रेयसी आणि त्याच्या मित्राला शुक्रवारी रात्री अटक केली. आरोपींवर भादवी कलम 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (Woman Killed Unilateral Lover Help Of Her Boyfriend in junnar)

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार, 12 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गालगत असलेल्या अयोध्या हॉटेलसमोर ही घटना घडली. साबीर मोहंमद शफी ब्यापारी (45) असे हत्या करण्यात आलेल्या प्रियकराचे नाव आहे. तसेच, जेबा इरफान फकीर (32) असे त्याच्या प्रेयसीचे नाव असून अभिजित सोनवणे (28) असे तिच्या मित्राचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी अभिजित सोनवणे आणि जेबा इरफान फकीर यांना शुक्रवारी रात्री अटक केली.

- Advertisement -

नेमकं प्रकरण काय?

साबीर मोहंमद शफी आणि जेबा इरफान फकीर हे एकमेकांचे शेजारी असून ते जुन्नर तालुक्यातील पणसुंबा पेठ येथे राहणारे रहिवाशी आहेत. साबीर मोहंमद शफी हा जेबा इरफान फकीर हिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. पण जेबा हीचे दुसऱ्याच मुलावर (अभिजीत सोनावणे) प्रेम होते. जेबा ही कांदळी वसाहतीतील एका कंपनीत कामाला होती. कांदळी येथे नोकरीकरीता जाण्याकरीता जेबा दररोज जुन्नर ते कांदळी असा प्रवास करत होती. या प्रवासदरम्यान जेबा आणि अभिजीतची मैत्री झाली. अभिजित सोनवणे हा तालुक्यात शेतजमीन मोजणीचे काम करतो.

हेही वाचा – Mumbai Crime : भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसाला मारहाण, गोरेगावतील घटनेने खळबळ

- Advertisement -

कालांतराने जेबा आणि अभिजीतच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यामुळे जेबा कामनिमित्त जुन्नर ते कांदळी असा प्रवास करत असताना त्यांची दररोज भेट व्हायची. याबाबत साबीर मोहंमद शफी ब्यापारी याला माहिती मिळाली. त्यानंतर साबीर याने जेबावर वॉच ठेवण्यास सुरूवात केली. त्यावेळी अभिजीत आणि जेबा यांच्यात कायतरी सुरू असल्याचा संशय त्याला आला. यावरून साबीर आणि अभिजित यांच्यात वाद निर्माण झाला होता.

विशेष म्हणजे रमजान सणानिमित्त अभिजित गुरुवारी जेबाच्या घरी आला होता. त्यावेळी साबीर ने त्याला तू इथे का आलास? असा सवाल विचारला. त्यावेळीही साबीर आणि अभिजित यांच्यात वाद निर्माण झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी जेबा कामानिमित्त कांदळीच्या दिशेने निघाली असता, साबीरने तिचा पाठलाग केला. त्यावेळी जेबाने साबीर पाठलाग करत असल्याची माहिती अभिजीतला फोनवरून दिली.

त्यानंतर शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास साबीर हा पुणे नाशिक महामार्ग लगत असलेल्या आयोध्या हॉटेल येथे उभा होता. त्याचवेळी संधी साधत अभिजितने साबीर याच्या अंगावरून गाडी नेली. यामध्ये साबीरचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच नारायणगाव पोलिसांनी अभिजीत आणि जेबा यांना ताब्यात घेतले. त्यावेळी पोलिसांनी दोघांची चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी दोघांविरोधात भादवी कलम 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर येत आहे.


हेही वाचा – SYDNEY TERROR ATTACK : ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध मॉलवर दहशतवादी हल्ला, अनेकांचा मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -