घरमहाराष्ट्रLok Sabha Election 2024 : मनसे करणार महायुतीचा प्रचार, राज ठाकरेंची घोषणा

Lok Sabha Election 2024 : मनसे करणार महायुतीचा प्रचार, राज ठाकरेंची घोषणा

Subscribe

लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयानंतर त्यांनी आता महायुतीला प्रचारात देखील पूर्ण सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर आज शनिवारी (ता. 13 एप्रिल) राज ठाकरे यांनी मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते महायुतीच्या उमेदवारांचा प्रचारही करणार असल्याचे जाहीर केले आहे. आज मुंबईत राज ठाकरेंनी पक्षाचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी यांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर प्रसार माध्यमांसमोर त्यांच्याकडून याबाबतची माहिती देण्यात आली. (Lok Sabha Election 2024 MNS will campaign for candidates of Mahayuti in Maharashtra)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज एमआयजी क्लबमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन महायुतीला प्रचारात सहकार्य करायचे की नाही, यासंदर्भातील बैठक घेतली. या बैठकीत महायुतीच्या उमेदवारांना प्रचारात सहकार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट करत म्हटले की, 2014 च्या आधीच भूमिका ही निवडून आल्यावर तिकडे बदलू शकते तर मलाही भूमिका बदलणे आवश्यक होते. सगळे म्हणतात, राज ठाकरेंनी भूमिका बदलली पण याला भूमिका बदलणे म्हणत नाहीत, तर धोरणांवर टीका करणे म्हणतात, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Sanjay Raut : भ्रष्टाचाराचे शेण खाण्यापेक्षा…, राऊतांची पंतप्रधान मोदींच्या विधानावर सडकून टीका

तसेच, मी मुख्यमंत्री पदे हवे म्हणून किंवा माझे 40 आमदार फोडले म्हणून टीका नाही केली. ज्या भूमिका मला पटल्या नाहीत, त्यावर मी तेव्हा स्पष्टपणे बोललो, असे सांगत राज ठाकरे म्हणाले की, अनेक पेंडिग विषय आहे. तसाच राम मंदिराचा विषय राहू गेला असता. मी अनेक गोष्टींचे स्वागत केले. चांगल्या गोष्टी होताना दिसतात तेव्हा एका बाजूला कडबोळे आणि एका बाजूला खंबीर नेतृत्व अशावेळी पुन्हा त्यांना एकदा संधी देणे आवश्यक आहे वाटले. म्हणून मोदींना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे राज ठाकरे यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले.

- Advertisement -

महाराष्ट्रासाठी आमच्या काही मागण्या आहेत. त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या जातील. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यापासून ते गड किल्ल्यांचे संवर्धन असे अनेक विषय आहे. यात अनेक गोष्टी असतात. औद्योगिकदृष्ट्या महाराष्ट्र पुढारला आहे. उद्योगपतींकडून प्राधान्य देण्यात येणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. मोदींना सर्व राज्य मुलांसारखे समान असले पाहिजे. त्यांना गुजरात प्रिय असणे स्वाभाविक आहे. कारण ते गुजरातचे आहे. पाच वर्षात ते सर्व राज्यांना समान पाहतील ही अपेक्षा आहे. त्यांना आज पाठिंबा दिला आहे. त्यासाठीच आमच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली, असे राज ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आले.

हेही वाचा… Sanjay Raut : राजकारण आम्हालाही कळते…, राऊतांनी प्रकाश आंबेडकरांना सुनावले

महायुतीला प्रचारात सहकार्य करणार…

भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षाच्या लोकांनी किंवा उमेदवारांनी आमच्या कोणत्या लोकांशी संपर्क साधायचा? कोणाशी बोलायचे? आणि पुढे कशाप्रकारे जायचे त्याची यादी दोन दिवसात तयार होईल आणि ती त्यांच्यापर्यंत जाईल. आमचेही पदाधिकारी असतील त्यांना योग्य मानाने वागवतील अशी अपेक्षा आहे. कोणाशी संपर्क साधायचा याचा घोळ नको म्हणून यादी देऊ. त्यांनाही सोयीस्कर जाईल. पूर्णपणे सहकार्य करायचे आहे. पूर्ण प्रचार करायचा आहे. संपर्क साधल्यावरच प्रत्यक्ष काम सुरू होईल, अशी माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -