घरक्राइमSydney Terror Attack : ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध मॉलवर दहशतवादी हल्ला, अनेकांचा मृत्यू

Sydney Terror Attack : ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध मॉलवर दहशतवादी हल्ला, अनेकांचा मृत्यू

Subscribe

ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे एका मॉलवर दहशतवादी हल्ला (Sydney Terror Attack) झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. दहशवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात काहींचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाल्याचे समजते.

सिडनी : ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे एका मॉलवर दहशतवादी हल्ला (Sydney Terror Attack) झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. दहशवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात काहींचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाल्याचे समजते. या हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच, मॉलमधून हजारो लोकांना बाहेर काढले. शिवाय, गोळीबारात जखमी झालेल्या नागरिकांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Sydney Terror Attack Several People Killed Mall In Australia)

मिळालेल्या माहितीनुसार, वेस्टफील्ड बॉन्डी जंक्शन मॉल परिसरात गोळीबार झाला. दोन अज्ञात हल्लेखोरांनी (Sydney Terror Attack) हा हल्ला केल्याचे समजते. पोलिसांनी अधिक तपास करत हा दहशतवादी हल्ला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला. या हल्ल्यानंतर मॉलमध्ये एकच गोंधळाची स्थिती निर्माण झाली. सद्यस्थितीत न्यू साऊथ वेल्स राज्याच्या पोलिसांनी संपूर्ण मॉल परिसरातील सुरक्षेत वाढ केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून काही फोटोही व्हायरल झाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – London Indian Embassy: भारतीय दूतावासावरील हल्ल्याच्या तपासात चूक; NIA ची नामुष्की

या हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. दोन हल्लेखोरांपैकी एकाचा खात्मा करण्यात आला असून दुसऱ्याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. या घटनेनंतर स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बोंडी जंक्शनवर हा हल्ला झाला. दुकानदारांना लक्ष्य करण्याचा हल्लेखोरांचा उद्देश होता. मॉल कॅम्पसमध्ये इमरर्जन्सी सेवा बहाल करण्यात आल्या आहेत. लोकांना सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शॉपिंग सेंटरमध्ये गोळीबाराचा आवाज ऐकल्याच स्थानिकांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

या घटनेनंतर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला वेस्टफील्ड बॉन्डी जंक्शन मॉल परिसरात झाला. शनिवारी दुपारी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी या मॉलमध्ये गर्दी केली होती. सध्या मॉल बंद करण्यात आला असून, पोलिसांनी लोकांना या क्षेत्रापासून लांब राहण्याचा सल्ला दिला आहे.


हेही वाचा – War Fear : इराण, इस्राएलला जाऊ नका; केंद्र सरकारचे भारतीयांना निर्देश

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -