घरमहाराष्ट्रSanjay Raut : भ्रष्टाचाराचे शेण खाण्यापेक्षा..., राऊतांची पंतप्रधान मोदींच्या विधानावर सडकून टीका

Sanjay Raut : भ्रष्टाचाराचे शेण खाण्यापेक्षा…, राऊतांची पंतप्रधान मोदींच्या विधानावर सडकून टीका

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात इंडिया आघाडीवर केलेल्या टीकेचा खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. राऊतांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (ता. 12 एप्रिल) एका प्रचाराच्या भाषणात इंडिया आघाडीचे लोक श्रावणात मटण खातात, असा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांच्या या विधानाचा आता विरोधकांकडून समाचार घेण्यात येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी याच मुद्द्यावरून आता पंतप्रधान मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे. कोण मटण खातो, कोण मासळी खातो, हा काय प्रचाराचा मुद्दा होऊ शकतो का? असे म्हणत राऊतांनी पंतप्रधानांवर टीकास्त्र डागले आहे. (Sanjay Raut criticized PM Narendra Modi on his Non-veg statement)

आज शनिवारी (ता. 13 एप्रिल) प्रसार माध्यमांशी संवाद साधताना खासदार संजय राऊत म्हणाले की, कोण मटण खातो, कोण मासळी खातो, याचा उल्लेख पंतप्रधान मोदी प्रचार सभेत करत असतील तर त्यांना पराभवाची भीती वाटत आहे. कारण देशाच्या विकासाचे कोणतेही मुद्दे त्यांच्याकडे नाहीत. विरोधक जर मटण खात असतील तर स्वतःला हिंदुत्ववादी समजणाऱ्या मोदींचा भाजपा पक्ष गोमांस निर्यात करणाऱ्या पाच कंपन्यांकडून साडेपाचशे कोटी रुपयांचा निधी घेतला, त्यावर का बोलत नाही? या प्रकरणावर आधी पंतप्रधान मोदींनी बोलावे, असा सणसणीत टोलाच राऊतांनी लगावला आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Sanjay Raut : राजकारण आम्हालाही कळते…, राऊतांनी प्रकाश आंबेडकरांना सुनावले

तर, कोण चिकन खातं, कोण खात नाही, हा काय प्रचाराचा मुद्दा आहे का? बीफ निर्यात करणाऱ्या पाच कंपन्यांकडून भाजपाने साडेपाचशे कोटी निधी घेतला, याचे उत्तर पंतप्रधान मोदी यांनी द्यावे. पराभवाच्या भीतीने मोदींच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच मोदी बिनबुडाचे मुद्दे काढून प्रचार सभेत भाषण करत आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जाहीर सभेत सांगितले की, आमचे सरकार आल्यानंतर 30 लाख रिक्त पदे भरू. नोकऱ्या देऊ, याला मुद्दे म्हणतात. भाजपासारखे भ्रष्टाचाराचे शेण खाण्यापेक्षा, मटण खाणे चांगले, असा आरोप खासदार संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला आहे.

- Advertisement -

पंकजा मुंडेंसाठी निवडणूक सोपी नाही…

लोकसभेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या विरोधात उमेदवार मिळत नाही. ही जागा लढवण्यावरून वाद आहे. लाखो मुस्लिम शिवसनेच्या समर्थनार्थ समोर आले आहेत. अनेक दलित आणि मुस्लिम संस्था या संविधान रक्षणसाठी एकत्र येत आहेत. शिवसेनेचे मराठवाड्यातील चारही उमेदवार विजयी होणार आहेत. जालना आणि लातूरमध्ये बदल होणार आहे. पंकजा मुंडे यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नाही, त्यांच्यासमोर मोठे आव्हान आहे आणि नांदेडमधील आदर्श टॉवर महाविकास आघाडीच्या धडकेने ढासळेल, अशी घणाघाती टीका यावेळी खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

हेही वाचा… PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट? भाजपा नेत्याचे धक्कादायक विधान

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -