मशिदींवरील भोंग्यांप्रमाणे मंदिरांचेसुद्धा भोंगे खाली…, राज ठाकरेंचं मंदिरांवरुन मोठं वक्तव्य

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील मशिदींवरील भोंग्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मशिदींवरील अनधिकृत भोंगे हटवण्यात यावेत अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे. तसेच हा प्रश्न फक्त मशिदींवरील भोंग्यांचा नाही तर गरज पडल्यास मंदिरांवरील अनधिकृत भोंगेसुद्धा काढण्यात यावेत असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं आहे. मुंबईत १३५ मशिदींमध्ये सकाळी ५ वाजण्यापूर्वी अजान देण्यात आली. या मशिदींवरसुद्धा कारवाई करणार का? असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये मशिदींच्या भोंग्यांसह मंदिरांवरील भोंग्यांविरोधातील भोंग्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. राज ठाकरे म्हणाले की, हा विषय मशिदींवरील भोंग्यांचा आहे. असे काही नाही तर मंदिरांवरसुद्धा भोंगे आहेत ते सुद्धा खाली काढण्यात आले पाहिजे असे राज ठाकरेंनी सांगितले.

अनधिकृत मशिदींवर अधिकृत भोंग्यांची परवानगी

आता मुंबईत ज्या मशिदी आहेत त्यातील बहुतांश मशिदी अनधिकृत आहेत. त्याला सरकार अधिकृत भोंग्यांसाठी परवानगी देते, ही कल्पनेच्या बाहेरची गोष्ट आहे. अनधिकृत मशिदींवर अधिकृत भोंग्यांची परवानगी कोणासाठी आणि कशासाठी देत आहेत. दिवसभर जे काही चार ते पाच वेळा बांग दिली जाते ती जर परत दिली तर आमची लोकं हनुमान चालिसा वाजवणार म्हणजे वाजवणारच असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. प्रश्न असा आहे की, न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणार असाल तर त्यानुसार ४५ ते ५५ डेसिबलपर्यंत स्पीकर लावू शकता, तुम्ही ३६५ दिवसांची परवानगी कशी देऊ शकता. आम्हाला १० ते १२ दिवसांची परवानगी देणार आणि तुम्ही त्यांना ३६५ दिवसांची परवानगी कशी देऊ शकता, त्यांनासुद्धा रोजच्या रोज परवानगी घेण्यास लावा असे राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

पहिले भोंगे खाली उतरवा, पोलिसांना एकच धंदा आहे का रोज डेसिबल मोजत बसायचे, तुम्हाला प्रार्थना म्हणायची आहे तर म्हणा परंतु तुम्हाल माईक लागतोय कशाला? यामुळे आमची मागणी आहे की, मशिदींवरील भोंगे उतरवण्यात यावेत, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरुच राहणार, सरकार सांगत आहे आदेशाचे पालन करत आहे. मग करायचे असेल तर पूर्ण करा, यांना वाटत असेल ९२ टक्के आजान झाली नाही म्हणून खूश होऊ असे अजिबात नाही. जास्त अजान सुरु राहिल्या तर हनुमान चालिसा सुरु राहणार, काल सांगितले आहे परत सांगतो हा सामाजिक विषय आहे. धार्मिक विषय नाही. याला धार्मिकतेचा रंग दिला तर आम्हीसुद्धा धार्मिक रंग देऊ, आमची अजिबात इच्छा नाही की दंगली व्हाव्यात, औरंगाबादमध्ये भाषणादरम्यान बांग देण्यात आली. दंगल करायची असती तर तिथे काय घडलं असते असे अजित पवार म्हणाले आहेत.


हेही वाचा : भोंग्यांचा विषय फक्त एक दिवसाचा नाही, आंदोलन सुरुच राहणार, राज ठाकरे भूमिकेवर ठाम