घरमहाराष्ट्रराजस्थानमध्ये भाजपची अवस्था 'केले तुका आणि झाले माका'; सेनेचा सामनातून टोला

राजस्थानमध्ये भाजपची अवस्था ‘केले तुका आणि झाले माका’; सेनेचा सामनातून टोला

Subscribe

पायलट यांचे बंड फसल्याने भाजपचे कारस्थान उघड झाले. हे बंड फसफसले नसते तर त्या आनंदोत्सवात सगळे गुन्हे पचवले गेले असते.

राजस्थानमधील सत्तासंघर्षावर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून भाजपवर टीका करण्यात आली आहे. काँगेस पक्षावर, त्यांच्या कार्यपद्धतीवर फुले उधळण्याची आवश्यकता नाही. त्यांच्यात अंतर्गत कलह किंवा जुने-नवे वाद आहेत व ते संपणारे नाहीत. पण राजस्थान प्रकरणात भाजपची अवस्था ‘केले तुका आणि झाले माका’ अशीच झाली आहे, असा टोला शिवसेनेनं भाजपला लगावला आहे.

राजस्थानमधील राजकीय नाट्यावर सामना संपादकीयमधून भाष्य करण्यात आलं असून फोन टॅपिंग तसंच पैशांच्या बळावर सरकार पाडणं घटनाद्रोह असल्याचं म्हटलं आहे. “राजकीय पुढाऱ्यांचेच काय, तर कोणाचंही खासगी संभाषण चोरून ऐकणे हा गुन्हाच आहे. हा एखाद्याच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावर घालाच आहे. त्यामुळे केंद्रीय गृहखाते याबाबत चौकशी करणार असेल तर त्यात चुकीचं काही नाही. प्रश्न इतकाच आहे की, गेहलोत सरकारला हे का करावं लागलं हा आहे” असा सवाल सामनातून केला आहे.

- Advertisement -

“राजस्थानमधील राजकीय युद्धाचे कवित्व अद्यापि संपलेलं नाही. भारतीय जनता पक्षाबरोबर सचिन पायलट यांची जी सौदेबाजी सुरू होती ती पैशांच्या देवाणघेवाणीच्या टोकापर्यंत होती. म्हणजे राजस्थानचे गेहलोत सरकार हे पैसे चारून पाडायचं, घोडेबाजार करून बहुमत विकत घ्यायचं हे ठरलं होतं. सचिन पायलटांचे अन्यायाविरुद्ध बंड वगैरे प्रकरण झूठ होते याचा पर्दाफाश मुख्यमंत्री गेहलोत यांनी केला आणि त्यासाठी पायलट व भाजप नेत्यांमधील फोन संभाषण समोर आणलं. ते धक्कादायक तितकेच खळबळजनक आहे. गेहलोत सरकार पाडण्यासाठी केंद्रीय सत्तेचा दबाव व पैशांचा वापर झाला. तो काँगेसने उधळून लावला,” असं सामनात म्हटलं आहे.

“राजस्थानात राष्ट्रपती राजवट लावा अशी मागणी करणाऱ्यांनी अद्याप त्यांच्या केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा का घेतला नाही? आधी गजेंद्र शेखावत यांचा राजीनामा घ्या, आमदार खरेदीच्या गुन्ह्याबद्दल प्रायश्चित्त घ्या व मग गेहलोत सरकारकडे बोट दाखवा. पायलट यांचे बंड फसल्याने भाजपचे कारस्थान उघड झाले. हे बंड फसफसले असते तर त्या आनंदोत्सवात सगळे गुन्हे पचवले गेले असते,” असं शिवसेनेनं सामनात म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख कोरोना पॉझिटिव्ह


“महाराष्ट्रात सहा महिन्यांपूर्वी जे सत्ता स्थापनेचे रोमांचक नाट्य घडलं, त्यात विरोधकांच्या फोन टॅपिंगची एक छटा होतीच. त्यावर बोलले की, अनेकांना मिरच्या झोंबतात, पण या मिरच्यांना बाजारात आज भाव उरलेला नाही. अशा मिरच्यांत तिखटपणा कमी व तडतडणं जास्त. तसं तडतडणे भाजपकडून सुरू आहे. पायलट यांचे बंड फसल्याने भाजपचे कारस्थान उघड झाले. हे बंड फसफसले नसते तर त्या आनंदोत्सवात सगळे गुन्हे पचवले गेले असते,” अशी जहरी टीका करण्यात आली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -