घरताज्या घडामोडीमहाराष्ट्राला येणारा ऑक्सिजन अडवू नका, गृह सचिवांनी सर्व राज्यांना पत्र लिहिल्याची राजेश...

महाराष्ट्राला येणारा ऑक्सिजन अडवू नका, गृह सचिवांनी सर्व राज्यांना पत्र लिहिल्याची राजेश टोपेंची माहिती

Subscribe

ऑक्सिजन आणण्यासाठी नायट्रोजन टॅंकरचा ऑक्सिजन टॅंकरमध्ये रुपांतर

वाढत्या कोरोना परिस्थितीवर आणि औषध, ऑक्सिजन तुटवड्याबाबत दोन बैठका घेण्यात आल्या आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन आणि उद्योगजगतातील काही लोकांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बैठक घेतली. यामध्ये राज्य शासनाच्या वतीने केंद्रीय आरोग्यमंत्र्यासोबत घेतलेल्या बैठकीमध्ये महत्त्वाचे काही मुद्दे मांडले यामध्ये त्यांना माहिती देण्यात आली की राज्यात साडे सहा लाखांच्यावर रुग्ण आहेत. केंद्र सरकारने दिलेले नियम कसे पाळले जात आहेत. ब्रेक द चैन, ३ टी, कोविड तंत्र कसे पाळत आहोत. याबद्दल सविस्तर सांगितले.

राज्यात डॉक्टरांची कमतरता, रेमडेसिवीर, बेड, ऑक्सिजन कमी असल्यामुळे ब्रेक द चैन मोहिम राबवली आहे. तसेच ऑक्सिजन बाबत सांगितले की, राज्यात सध्या १५०० मेट्रीक टन ऑक्सिजन आहे. वैद्यकीय सेवेसाठी वापरत आहोत.

- Advertisement -

उद्योग जगतातील उद्योजकांशी घेतलेल्या बैठकीत जे एस ड्ब्लू चे राठोड म्हणाले की १९५ टन पुढच्या पाच दिवसानंतर वाढवून राज्याला पुरवठा केला जाईल अशी खात्री त्यांनी दिली पाहिजे. तसेच उद्योग क्षेत्रातील काम बंद करुन ऑक्सिजन देऊ असे सांगितले. परंतु केंद्राला विनंती केली आहे की, बाहेरील राज्यातील ऑक्सिजन पुरवठ्यासाठी जी व्यवस्था केली आहे. तो आमच्यापर्यंत पोहचला पाहिजे अशी तयारी केली पाहिजे.

केंद्राने सर्व विभागांशी समन्वय करुन ऑक्सिजन ज्या राज्यांतून दिले जात आहे. या सगळ्या राज्यातून येणारा ऑक्सिजन आम्हाला मिळाला पाहिजे. काही राज्य अडवणूक करत आहे. ते आडवायला नको यासाठी सर्व राज्यांच्या गृह सचिवांना पत्र पाठवले आहे. १५ ते ३० एप्रिलपर्यंतसाठी कोणत्या राज्यातून कशाप्रकारे ऑक्सिजन पुरवणार यासाठी एक वेळापत्रक तयार केले आहे. यामध्ये कोणत्या राज्यातून कुठून किती ऑक्सिजन येईल यासाठी ऑक्सिजन आणण्यासाठी नायट्रोजन टॅंकरचा ऑक्सिजन टॅंकरमध्ये रुपांतर केले आहे. त्याव्यतिरिक्त तुम्हीही काही टॅंकर आम्हाला ऑक्सिजन पुरवठ्यासाठी द्या किंवा ट्रेनमध्ये जे व्हॅगन्स आहेत त्यावर काही टॅंकर ठेवून लांबून आणता येऊ शकतील अशी मागणी केली आहे. त्यावर तत्परतेने कारवाई होईल अशी आपेक्षा आहे. गृह सचिवाचे पत्र आणि गृह सचिवाच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये अडचण येऊ नये असे सांगितले आहे.

- Advertisement -

तसेच त्यांनी सांगितले की हवेतून ऑक्सिजन तयार करण्यासाठी काही प्रकल्प असतात ते आम्ही मोफत देऊ १६२ प्रकल्प देण्याचा विचार केला आहे. त्यातील महाराष्ट्राला काही मिळते काय ते पाहायला पाहिजे. असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -