घरमहाराष्ट्रMaharashtra New DGP : रजनीश शेठ राज्याचे नवे पोलीस महासंचालक; पांडे मूळ...

Maharashtra New DGP : रजनीश शेठ राज्याचे नवे पोलीस महासंचालक; पांडे मूळ पदावर

Subscribe

राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रजनीश शेठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे रजनीश शेठ हे आता राज्याचे नवे पोलीस महासंचालक असणार आहेत. संजय पांडे यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला होता, मात्र यावरून न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच फटकारले होते. त्यामुळे राज्य सरकारने आता संजय पांडे यांच्याकडून त्या पदाचा अतिरिक्त पदभार काढून घेत रजनीश शेठ यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली आहे. यापूर्वी देखील संजय पांडे यांची डीजीपी होमगार्ड पदावरून महाराष्ट्र स्टेट सिक्योरिटी कॉर्पोरेशन पदावर नियुक्त करण्यात आली होती.

रजनीश शेठ हे 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. आझाद मैदानात झालेल्या दंगलीच्या घटनेवेळी रजनीश शेठ हे मुंबईच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सहपोलिस आयुक्त म्हणून कार्यरत होते. फोर्स नव महाराष्ट्राचे ते प्रमुख देखील राहिले आहेत. तसेच गृह विभागाच्या प्रधान सचिव पदाची जबाबदारी देखील त्यांनी सांभाळली आहे. राज्याच्या कायदा आणि सुव्यस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणूनही त्यांनी काम केलेय. नुकतीच त्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. शांत स्वभावाचे अधिकारी म्हणून रजनीश शेठ यांची ओळख आहे. रजनीश शेठ आतापर्यंत कुठल्याच वादात सापडलेले नाहीत.

- Advertisement -

दरम्यान एप्रिल 2021 पासून संजय पांडे हे राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा प्रभारी कार्यभार सांभाळत होते. मात्र राज्याला पूर्ण वेळ पोलीस महासंचालक मिळावा अशी मागणी अनेक दिवसांपासून केली जातेय. ही मागणी लक्षात घेता अखेर शुक्रवारी (18 फेब्रुवारी) रजनीश सेठ यांची महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. मुंबईत 26/11 च्या हल्ल्याच्या वेळी फोर्स वनची स्थापना करण्यात आली होती. तेव्हा रजनीश सेठ या संघाचे प्रमुख होते. रजनीश सेठ हे दोन वर्षे मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्तही होते.

- Advertisement -

राज्याच्या डीजीपीची नियुक्ती अशी होती

राज्यातील पोलीस महासंचालकांची नियुक्ती एका प्रक्रियेद्वारे केली जाते. राज्यातील 10 वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे (UPSC) पाठवलीत. यूपीएससीने तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावांची शिफारस केली. या तिघांपैकी कोणत्याही एकाची डीजीपी पदावर नियुक्ती केली जाते. हेमंत नागराळे, के. व्यंकटेशम, रजनीश सेठ यांच्या नावांची शिफारस करण्यात आली होती. या नावांपैकी रजनीश सेठ यांची सरतेशेवटी निवड करण्यात आली.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -