घरमहाराष्ट्रठरलं! राजू शेट्टी 'स्वाभिमानी'मधूनच विधानपरिषदेची आमदारकी स्वीकारणार

ठरलं! राजू शेट्टी ‘स्वाभिमानी’मधूनच विधानपरिषदेची आमदारकी स्वीकारणार

Subscribe

माजी खासदार राजू शेट्टी यांच्या विधानपरिषदेच्या आमदारकीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. आमदारकीच्या उमेदवारीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत निर्माण झालेला वाद अखेर मिटला असून राजू शेट्टी ही निवडणूक लढवणार असल्याचे समजते. शेतकऱ्यांच्या व्यापक हितासाठी स्वाभिमानी शेतकरी एकसंघ ठेवण्याचा निर्णय झाला असून आता राजू शेट्टी आमदारकी स्वीकारणार असल्याची माहिती मिळत आहे. काल रात्री उशीरा या संबंधीची बैठक पार पडली असून राजू शेट्टी यांच्या बैठकीत नाराज प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, सावकार मादनाईक याची नाराजी दूर करण्यात आली आहे.

स्वाभिमानीतील नाराजी दूर 

विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी यासंदर्भात शेट्टी यांनी शरद पवार यांची भेट देखील घेतली होती. मात्र यानंतर संघटनेतील काही पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. यानंतर राजू शेट्टी यांनी फेसबुक एक भावनित पोस्ट शेअर केली होती. दीर्घकाळच्या मैत्रीत दुरावा निर्माण करुन एकमेकांबद्दल अविश्वास निर्माण करणारी विधानपरिषद ब्यादच आपल्याला नको, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले होते. राजू शेट्टी यांच्या या भावनिक पोस्टनंतर राज्यभरातून संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांनीच आमदारकी स्वीकारावी, अशी मागणी केली जात होती.

- Advertisement -

काल राजू शेट्टी यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. शेतकऱ्यांच्या व्यापक हितासाठी स्वाभिमानी शेतकरी एकसंघ ठेवण्याचा निर्णय या बैठकीत झाला. राजू शेट्टी यांनी या बैठकीत नाराज प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, सावकार मादनाईक यांची नाराजी दूर केली. काल या दोन्ही नेत्यांसोबत चर्चा झाल्यानंतर वादावर पडदा पडला

हेही वाचा –

वादग्रस्त करोना बॉडी बॅग राज्य सरकार खरेदी करणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -