घरCORONA UPDATECorona Live Update: कल्याण डोंबिवलीत २४३ नव्या रूग्णांची वाढ

Corona Live Update: कल्याण डोंबिवलीत २४३ नव्या रूग्णांची वाढ

Subscribe
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात शनिवारी २४३ रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा ३२८८ वर पोहचला आहे. गेल्या २४ तासात दोन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कल्याण डोंबिवली शहरात कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होत असल्याने कल्याण डोंबिवलीकरांच्या चिंतेत भर पडली आहे. आतापर्यंत कोरोनाने ७१ जणांचा मृत्यू झाला असून, १३३८ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.सध्या १८४८ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

भिवंडीत कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. शनिवारी शहरात एकाच दिवसात कोरोनाचे ८१ नवे रुग्ण आढळले असून २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर ग्रामीण भागात ३६ नवे रुग्ण आढळले आहेत. आज शहर व ग्रामीण भागात एकूण ११७ नवे रुग्ण आढळले आहेत.
भिवंडी शहरात आतापर्यंत ८७५ रुग्ण आढळले असून त्यापैकी ४४९ रुग्ण बरे झाले आहेत तर ६६ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून ३६१ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर ग्रामीण भागात आतापर्यंत ३८७ रुग्ण आढळले असून त्यापैकी १४७ रुग्ण बरे झाले आहेत तर ८ रुग्णांचा मृत्यू झाला असून २३२ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. दरम्यान शनिवारी आढळलेल्या ११७ नव्या रुग्णांमुळे भिवंडीतील शहर व ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांचा एकूण आकडा १२६२ वर पोहचला असून त्यापैकी ५९५ रुग्ण बरे झाले आहेत तर ७४ रुग्णांचा मृत्यू झाला असून ५९३ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.

नाशिक शहरासह जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून, काही दिवसांपासून मालेगावात रूग्णसंख्या वाढीचा मंदावलेला वेग शनिवारी (दि.२०) पुन्हा वाढल्याचे धक्कादायक चित्र दिसून आले. जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात ११९ नवे रूग्ण आढळून आले. यात नाशिक शहरात ४९, नाशिक ग्रामीण- ४०, मालेगाव-२४ आणि जिल्ह्याबाहेरील ६ रूग्णांचा समावेश आहे. दिवसभरात नाशिक शहरातील ५ बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांचा आकडा २ हजार ६३५ वर पोहोचला असून, एकट्या नाशिक शहरात १ हजार १०१ रूग्ण आहेत. (सविस्तर वाचा)


ठाणे पोलीस दलातील दोन पोलीसांचा शुक्रवारी रात्री मृत्यू झाला असून मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र एकाचा मृत्यू कोरोनाने झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत असून मृत्यूनंतर त्यांची कोरोनाची चाचणी करण्यात आलेली असून अद्याप अहवाल आलेला नसल्याचे एका वरिष्ठ अधिकारी यांनी सांगितले.

- Advertisement -

सलूनवाला कोव्हिड योद्धा

कोरोना विषाणूमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखावा याकरता अत्यावश्यक सेवा वगळता काही गोष्टींवर बंदी आहे. यामध्ये मॉल्स, चित्रपट गृह, सलून हे देखील बंद आहेत. त्यामुळे एकीकडे सलून बंद असल्यामुळे अनेकांचे व्यवसाय देखील ठप्प झाले आहेत. तर दुसरीकडे व्यवसाय बंद असल्यामुळे रडत न राहता आपणही कोरोना लढ्यात सहभाग घेण्याची एका केस कर्तनकार व्यवसायिकाने तयारी दाखवली आहे. (सविस्तर वाचा)

- Advertisement -

धारावीत आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाच मागील जून महिन्यापासून ही संख्या नियंत्रणात येताना दिसत आहे. मात्र, शनिवारी दिवसभरात धारावीत केवळ ७ रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे आजवरची ही सर्वांत कमी रुग्ण संख्या आहे.


भायखळा पूर्व परिसरात असणाऱ्या केंद्र शासनाच्या अखत्यारीतील ‘रीचर्डसन आणि क्रुडास’ कंपनीच्या परिसरात तात्पुरत्या स्वरूपातील कोविडचे एक मोठे उपचार केंद्र उभारण्यात येत आहे. तब्बल १ हजार खाटांची क्षमता असलेल्या उपचार केंद्राच्या उभारणीचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. हे उपचार केंद्र जून महिन्याच्या अखेरीस रुग्ण सेवेत दाखल होईल, अशी माहिती ‘इ’ विभागाचे सहाय्यक आयुक्त मकरंद दगडखैर यांनी दिली आहे.


महापालिका अभियंत्यांची कामगिरी, केवळ १५ दिवसांत दिसून आली असून ३०० ‘ऑक्सीजन बेड’ सह १ हजार खाटांचे उपचार केंद्र महापालिका उभारणार आहे.


अमरावतीत आज सकाळी ५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ४११ वर गेली असून १७ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर २६४ जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर सध्या १३० जणांवर उपचार सुरु आहेत.


सौरव गांगुलीच्या कुटुंबात कोरोनाचा शिरकाव

दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत असून कोरोना विषाणूचा संसर्ग केवळ सामान्य नागरिकांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर आता भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याच्या परिवारातील सदस्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सौरव गांगुलीचा मोठा भाऊ स्नेहाशिष गांगुलीची पत्नी आणि तिच्या आई – बाबांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती पश्चिम बंगालच्या आरोग्य विभागाने दिली आहे. स्नेहाशिष गांगुली बंगाल क्रिकेट असोसिएशनमध्ये सचिव या पदावर कार्यरत आहे. (सविस्तर वाचा)


महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. मुबंई शहरातील वाढत्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारी बरोबरच पुण्यात देखील कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दरम्यान, कोरोना विषाणूचा संसर्ग केवळ सामान्य नागरिकांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर आता पालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची मोठ्या प्रमाणात लागण झाल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, पुणे पालिकेत नेहमीच वावर असलेल्या काही नगरसेवकांसह त्यांच्या जवळच्या नातलगांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यासोबतच पालिकेचे तब्बल १०८ अधिकारी आणि कर्मचारी देखील बाधित आहेत. त्यामुळे आता पुणे महानगरपालिकेची इमारत ‘हॉटस्पॉट’ ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (सविस्तर वाचा)


मुंबईतील केईएम हॉस्पिटलच्या उपहारगृहात काम करणाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून तेथील २१ कर्मचारी कोरोनााबाधित झाले आहेत. या उपहारगृहामधून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना जेवण पुरवले जाते.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गरीब कल्याण रोजगार अभियानाचे उद्घाटन. ६ राज्यातील ११६ जिल्ह्यांमध्ये अभियान राबवणार. लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरामुळे ज्यांच्या हातातून काम सुटेल त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारची ही योजना.


दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र सिंह यांच्यावर प्लाझ्मा थेरेपी करण्यात आली असून त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.


आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार देशात १९ जूनपर्यंत ६६ लाख १६ हजार ४९६ कोरोना चाचण्या झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तर गेल्या २४ तासात १ लाख ८९ हजार ८६९ कोरोना चाचण्या झाल्या आहेत.


देशात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत चालला असून गेल्या २४ तासांत १४ हजार ५१६ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाल्याची माहिती समोर येत आहे. तर ३७५ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे देशात आता एकूण ३ लाख ९५ हजार ०४८ इतके कोरोनाबाधित झाले आहेत. यामध्ये १ लाख ६८ हजार २६९ अॅक्टीव्ह केसेस असून आतापर्यंत २ लाख १३ हजार ८३१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. (सविस्तर वाचा)


औरंगाबाद वाळूज एमआयडीसीतील नामांकित बजाज कंपनीमध्ये गेल्या पाच-सहा दिवसात २० कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून याच भागातील स्टारवेज नावाच्या कंपनीतही २० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर वाळूज पंढरपूर भागात दीडशेपेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत. बजाज कंपनीने जे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत त्यांच्या आजूबाजूला काम करणाऱ्या १०० कर्मचाऱ्यांना होम क्वारंटाईन होण्याच्या सूचना दिल्या आहेत.


गेल्या २४ तासात मुंबईमध्ये १ हजार २६९ नवे कोरोना रुग्ण आढळले असून ११४ जणांचा त्यामुळे मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या ६४ हजार ०६८ इतकी झाली आहे. त्याचप्रमाणे ११४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ३४२३ वर पोहोचला आहे. मुंबईमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मुंबईमध्ये शुक्रवारी ११४ जणांचा मृत्यू झाला.


कोरोनामुळे राज्यात मृत्यू झालेल्या रुग्णांचा एकूण आकडा ५ हजार ८९३ इतका झाला आहे. यासोबतच रुग्णांचा आकडा देखील वाढत असून काल दिवसभरात ३ हजार ८२७ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख २४ हजार ३३१ वर पोहोचली आहे. त्यापैकी ५५ हजार ६५१ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तर ६२ हजार ७७३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -