घरदेश-विदेशRajya Sabha Elections : भाजपाची रणनीती ठरली; 'मविआ'साठी तारेवरची कसरत

Rajya Sabha Elections : भाजपाची रणनीती ठरली; ‘मविआ’साठी तारेवरची कसरत

Subscribe

भाजपाचे आमदार गोवर्धन शर्मा यांचे निधन झाल्यामुळे विधानसभेची एक जागा रिक्त झाली आहे. यामुळे राज्यसभा निवडणुकीसाठी विधानसभेतील 287 आमदार मतदान करणार आहेत.

मुंबई : राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यात देशातील 15 राज्यांसाठी 27 फेब्रुवारी मतदान होणार आहे. या राजसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील 6 जागांचा देखील समावेश आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपा 6 जागांपैकी 5 जागा जिंकण्यासाठी तयारी करत आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला दोन जागा जिंकून आणण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत खुले मतदान होणार असून यासाठी व्हीप महत्त्वाचा ठरणार आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन्ही पक्षात फूट पडल्यानंतर ही पहिली निवडणूक आहे.

सध्या राज्याची राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलेली आहे. भाजपाचे आमदार गोवर्धन शर्मा यांचे निधन झाल्यामुळे विधानसभेची एक जागा रिक्त झाली आहे. यामुळे राज्यसभा निवडणुकीसाठी विधानसभेतील 287 आमदार मतदान करणार आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी 42 मतांची आवश्यकता आहे. ठाकरे गटाकडे 15 ते 16 आमदार आणि शरद पवार गटाकडे 11 आमदार आहेत. यामुळे ठाकरे आणि शरद पवार गटाला राज्यसभेच्या निवडणुकीत विजयाचे गणिताची जमवा-जमव अवघड झाले आहे. त्यात ठाकरे गटला शिंदे गटाची व्हीप लागू होणार असल्यामुळे त्यांची कोंडी होणार असल्याचे चित्र दिसून येणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Solapur Crime : बापानेच मुलाला संपवलं! अभ्यास करत नसल्याने उचललं पाऊल

राज्याच्या विधानसभेत पक्षाची अशी आहे ताकद

भाजपा 104, अजित पवार गट 42, शिंदे गट 40, काँग्रेस 45, ठाकरे गट 16, शरद पवार गट 11, बहुजन विकास आघाडी 3, समाजवादी पक्ष, प्रहार जनशक्ती आणि एयाएम प्रत्येकी 2, मनसे, शेकाप, सीपीआयएम, स्वाभिमानी पक्ष, रासक, क्रांतीकारी शेतकरी पक्ष आणि जनसुराज्य शक्ती या पक्षांकडे प्रत्येकी 1 आणि अपक्ष 13 एकूण 287 असे विधानसभेत प्रत्येक पक्षाकडे आमदार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Weather Update : हवामान विभागाने थंडीबाबत दिला ‘हा’ इशारा

राष्ट्रवादीच्या निकालाकडे लक्ष

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार गटाची लढाईही निवडणूक आयोग आणि विधिमंडळात सुरू आहे. अद्याप खरी राष्ट्रवादी आणि पक्षाबाबत निर्णय आलेला नाही. यामुळे शिंदे गटाला आणि अजित पवार अजित पवार गटच्या जागा देणार का? शिंदे गटाकडे 40 आणि 10 अपक्ष संख्याबळ आहे, तर अजित पवार गटाकडे 42 आमदार आहे. यामुळे शिंदे आणि अजित पवार गटाने अपक्षांचे गणित जमविल्यानंतर दोघांचा एक-एक उमेदवार निवडून येऊ शकतो.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -