घरक्राइमSolapur Crime : बापानेच मुलाला संपवलं! अभ्यास करत नसल्याने उचललं पाऊल

Solapur Crime : बापानेच मुलाला संपवलं! अभ्यास करत नसल्याने उचललं पाऊल

Subscribe

पोटच्या मुलासाठी वाट्टेल ते करण्याची मानसिकता बाळगून आजही हजारो बाप राबराब राबतात. असे असतानाच एका बापाने त्याच्या पोटच्या गोळ्यालाच संपविल्याची धक्कादायक घटना सोलापूरमधून समोर आली आहे.

सोलापूर : पोटच्या मुलासाठी वाट्टेल ते करण्याची मानसिकता बाळगून आजही हजारो बाप राबराब राबतात. असे असतानाच एका बापाने त्याच्या पोटच्या गोळ्यालाच संपविल्याची धक्कादायक घटना सोलापूरमधून समोर आली आहे. मुलाच्या शीतपेयामध्ये विषारी पावडर टाकून त्याने हे कृत्य केलं. मुलगा अभ्यास करत, सतत खोड्या काढतो, मोबाइल पाहतो या किरकोळ कारणामुळे हे पाऊल उचल्याची कुबली निर्दयी बापाने दिली आहे. (Solapur Crime The father killed his son He took the step because he was not studying)

गुन्हेगारी कुठल्या स्तराला जाईल याचा कुणीच अंदाज बांधू शकत नाही. याची प्रचिती सोलापूरमधील घटनेने आली आहे. विजय सिद्राम बट्टू (43) असं नाव असलेल्या निर्दयी बापाने फक्त आणि फक्त मुलगा अभ्यास करत नाही. नेहमी खोड्या काढतो आणि सतत मोबाइल मागतो या कारणासाठी त्याला संपवून टाकण्यासारखं पाऊल उचललं. या घटनेमुळे सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. घटनेनंतर पोलिसांनी आरोपी विजय सिद्राम बट्टू यास अटक केली असून, त्याची कसून चौकशी केली असता त्याने ही कबुली दिली.

- Advertisement -

हेही वाचा : Kishori Pednekar ED Enquiry : किशोरी पेडणेकरांसह संदीप राऊत यांची आज ईडी चौकशी

संशयास्पद स्थिती आढळला होता मुलाचा मृतदेह

तुळजापूर रोडवर 13 जानेवारीला एका 14 वर्षीय मुलाचा संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी पोलिसांनी मुलाच्या अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. दरम्यान 28 जानेवारी रोजी पत्नीसोबत झालेल्या भांडणात विजय बट्टूने उडतउडत सांगितलं होतं की, त्यानेच मुलाला मारलंय. त्यानंतर पत्नीचा संशय बळावला. तिने पोलिसात जाऊन यासंदर्भातील माहिती दिली. पोलिसांनी विजय बट्टूला अटक करत त्याची चौकशी सुरु केली होती.

- Advertisement -

हेही वाचा :Ajit Pawar Interview : नेतृत्वाबद्दल विश्वास हवा; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा रोख कुणाकडे?

पोलिसी खाक्या दाखवताच दिली कबुली

पोलीस तपास करत असताना आरोपी हा पोलिसांना उडवा-उडवीची उत्तर देत होता. तो पोलिसांना सहकार्यसुद्धा करत नव्हता. मात्र, पोलीस निरीक्षक अजय जगताप यांनी पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली. या कबुली जबाबात त्याने अनेक खुलासे केले. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, इतक्या क्षुल्लक कारणासाठी आपल्या मुलाची हत्या केलेल्या बापावर संताप व्यक्त केला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -