घरमहाराष्ट्रनागपूरRambhakta In Nagpur : नागपुरात असाही रामभक्त; सोहळ्यादिनी वाटणार 'एवढ्या' किलोचा 'राम...

Rambhakta In Nagpur : नागपुरात असाही रामभक्त; सोहळ्यादिनी वाटणार ‘एवढ्या’ किलोचा ‘राम हलवा’

Subscribe

अयोध्येतील भव्य राम मंदिरात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणेची देशभरात तयारी अंतिम टप्प्यात आली असून, संपूर्ण देश राममय वातावरणात रंगत असतानाच उपराजधानी नागपूरमधील आचारी विष्णू मनोहर हे 7 हजार किलोचा ‘राम हलवा’ तयार करणार आहेत.

नागपूर : राम मंदिर लोकार्पण आणि रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची संपूर्ण देशात जय्यत तयारी सुरू आहे. या सोहळ्यानिमित्त विविध पक्ष, संघटनांकडून महाआरती तर कुठे भागवत सप्ताह, पारायणाचे आयोजन केले जात आहे. अशातच उपराजधानी नागपुरातून एक बातमी समोर आली आहे. नागपुरातील एक रामभक्त असे आहेत की, ते सोहळ्या दिनी तब्बल 7 हजार किलोचा राम हलवा वाटणार आहेत. त्यामुळे सध्या नागपूरमध्ये या राम हलव्याची आतापासूनच चर्चा रंगत आहे. (Rambhakta In Nagpur Such a Rambhakta in Nagpur Ram halwa of so many kilos will be felt on the day of celebration)

अयोध्येतील भव्य राम मंदिरात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणेची देशभरात तयारी अंतिम टप्प्यात आली असून, संपूर्ण देश राममय वातावरणात रंगत असतानाच उपराजधानी नागपूरमधील आचारी विष्णू मनोहर हे 7 हजार किलोचा ‘राम हलवा’ तयार करणार आहेत. राम मंदिर संकुलात होणाऱ्या या कार्यक्रमासाठी त्यांनी 12 हजार लिटर क्षमतेची कढई तयार केली असून त्यात राम हलवा बनवला जाणार आहे. विष्णू मनोहर म्हणाले की, या कढईचे वजन 1300-1400 किलो आहे. ती स्टीलची असून, कढईचा मधला भाग लोखंडाचा आहे. म्हणूनच त्यात खीर केल्यानंतर जळत नाही.

- Advertisement -

हेही वाचा : Mohammed Shami अर्जुन पुरस्काराने सन्मानित, दोन वर्षांनंतर क्रिकेटपटूचा गौरव

ही आहे कढईची विशेषतः

आचारी विष्णू मनोहर यांनी या खास कढईबद्दल सांगितले की, कढई आकार 10 फूट बाय 10 फूट आहे. ते म्हणाले, ‘ही 12 हजार लिटर क्षमतेची कढई असून त्यात 7000 किलो हलवा बनवता येतो. या कढईत हलवा तयार झाल्यानंतर, ही मोठी कढई उचलण्यासाठी क्रेनची आवश्यकता असेल. 900 किलो रवा, 1000 किलो तूप, 1000 किलो साखर, 2000 लिटर दूध, 2500 लिटर पाणी, 300 किलो ड्रायफ्रूट्स आणि 75 किलो वेलची पावडरचा वापर करून हलवा बनवण्यात येणार असल्याचे मनोहर यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा : Rajasthan Crime : धावत्या बसमध्ये महिलेवर बलात्कार! राजस्थानमधील घटनेने खळबळ

ही कार सेवा नाही, याला पाक सेवा म्हणा

रामलल्ला भोजन अर्पण केल्यानंतर हा प्रसाद सुमारे दीड लाख भाविकांमध्ये वाटला जाणार आहे. आचारी विष्णू मनोहर म्हणाले की, आम्ही या उपक्रमाला कार सेवेशी जोडले आहे आणि त्याला पाक सेवा असे नाव दिले आहे. याच्याशी आपल्या भावना जोडलेल्या आहेत. ते म्हणाले की, आंदोलनाच्या काळातील अयोध्येच्या तुलनेत आजची अयोध्या खूप बदलली आहे. अयोध्येत आज प्रचंड उत्साह आहे. वास्तविक, विष्णू मनोहर हे स्वतः रामजन्मभूमी आंदोलनाशी संबंधित राहिले. त्यांनी अयोध्येच्या कारसेवेत भाग घेतला. आता या कार्यक्रमाच्या माध्यमातून रामजन्मभूमी ट्रस्टच्या नावावर विश्वविक्रम नोंदवण्याची तयारी सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -