घरमहाराष्ट्रराहुल गांधींचा काँग्रेस पक्ष बांग्लादेशच्या क्रिकेट संघासारखा - आठवले

राहुल गांधींचा काँग्रेस पक्ष बांग्लादेशच्या क्रिकेट संघासारखा – आठवले

Subscribe

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज राहुल गांधी यांचा काँग्रेसपक्ष हा बांगलादेशाच्या संघासारखा असल्याचे सांगत काँग्रेसची खिल्ली उडवली.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता आरोप प्रत्यारोप होऊ लागले असून, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज राहुल गांधी यांचा काँग्रेसपक्ष हा बांगलादेशाच्या संघासारखा असल्याचे सांगत काँग्रेसची खिल्ली उडवली. सुनील वॅक्स म्युझियमच्या वतीने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी आणि सचिन तेंडुलकर यांचा मेणाचा पुतळा उभारण्यात आला होता. या पुतळ्याचे अनावरण मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडले. त्यावेळी आठवले यांनी आपल्या भाषणातून काँग्रेसवर जोरदार फटकेबाजी केली.

२०१९ मध्ये आम्हीच जिंकणार

दरम्यान २०१९ मध्ये आमची टीम जिंकणार आहे. काही प्रमाणात पेट्रोल, डिझेलचा अडथळा असला तरी आम्ही ही मॅच जिंकूच, असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. तसेच राहुल गांधी यांची टीम आमच्या समोर टिकणार नसल्याचे सांगत राहुल गांधी यांच्या टीम मध्ये त्यांनी जास्त रन काढू नयेत, अशी त्यांच्या खेळाडूची इच्छा असल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला. सगळ्यात महत्वाचे म्हणजे राहुल गांधी यावेळी ७० धावांवर आउट होतील, असे वाटत असल्याचे आठवलेंनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

पुढच्या वेळी मी डबल सेंच्युरी मारणार

आमच्या टीमचे कर्णधार नरेंद्र मोदी आहेत. आणि यावेळी नरेंद्र मोदींनी डबल सेंच्युरी मारावी, असे आठवले म्हणाले. त्याचबरोबर यावेळी आपण सिंगल सेंच्युरीच मारणार आणि पुढच्या वेळी डबल मारणार असल्याचेही आठवले म्हणाले.

हेही वाचा – #MeToo चा वापर नाहक बदनामीसाठी नको – रामदास आठवले

रामदास आठवलेंचे नवे तर्कट; पवारांनी एनडीएत सामील व्हावे
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -