घरदेश-विदेशपटेलांच्या पुतळ्याखाली लिहा 'हा' मेसेज - काँग्रेस

पटेलांच्या पुतळ्याखाली लिहा ‘हा’ मेसेज – काँग्रेस

Subscribe

काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री आंनद शर्मा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत (आरएसएस) एक विवादास्पद वक्तव्य केले आहे. त्यांनी गुजरात मध्ये बांधण्यात येणाऱ्या सरदार बल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ या स्मारकाखाली एक मेसेज लिहिण्याची मागणी केली आहे. हा मेसेज अत्यंत खळबळजनक असा आहे. सरदार बल्लभभाई पटेल यांनी १९४८ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याचे आदेश दिले होते. पटेलांचा हा आदेश त्यांच्या पुतळ्याखाली लिहा, जेणेकरुन भविष्यात जे लोक हा पुतळा पहायला येतील, त्यांना पटेलांच्या या आदेशाबाबतदेखील माहिती होईल. आनंद शर्मा यांच्या या मागणीमुळे आता मोठा वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शर्मा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, असा मेसेज त्यांच्या पुतळ्याखाली लिहिल्यामुळे जगाला कळेल की, देशाचे पहिले गृहमंत्री आरएसएसबाबत काय विचार करत होते. आरएसएस आणि भारतीय जनता पक्षाचा स्वतःचा असा एकही मोठा नेता नाही, त्यामुळेच त्यांनी सरदार पटेलांचा पुतळा उभारण्याचा घाट घातला आहे. महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर पटेल यांनी १९४८ साली स्वतः आरएसएस बॅन करण्याचा आदेश दिला होता. त्याची प्रतदेखील उपलब्ध आहे.

राफेलबाबत चौकशीची मागणी

शर्मा यांनी राफेल डीलबाबतदेखील भाष्य केले. ते म्हणाले की, राफेल डीलमध्ये घोटाळा झाला आहे. हा घोटाळा लपवण्यासाठी मोठे ‘कवर-अप ऑपरेशन’ सुरू आहे. राफेलचा घोटाळा लपवला जाऊ नये यासाठी संबधित सर्व फाईल्स तसेच डीलच्या नोटीसांवर सील लावण्याची आम्ही मागणी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -