घरमहाराष्ट्रबच्चे कंपनीसाठी खुशखबर; राणीच्या बागेत आता मगर आणि सुसरही पाहता येणार

बच्चे कंपनीसाठी खुशखबर; राणीच्या बागेत आता मगर आणि सुसरही पाहता येणार

Subscribe

 

मुंबईः महानगरपालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयात (राणीची बाग) येणार्‍या पर्यटकांना आता मगर आणि सुसरही पाहणे शक्य होणार आहे. पर्यटक आणि मुलांसाठी उद्यानातील ‘क्रॉक ट्रेल’ (मगर आणि सुसर साठीचे मोठे तळे) पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. त्यामुळे उद्यानात येणाऱ्यांना मगर आणि सुसर पाहण्याची संधी उपलब्ध होत असून पर्यटकांच्या गर्दीतही वाढ होत आहे.

- Advertisement -

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबालसिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, उपायुक्त (उद्याने) किशोर गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली राणी बागेत पर्यटकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून नवनवीन प्राण्यांचा समावेश झाल्यानंतर पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. त्यातच आता जलचर आणि उभयचर प्राण्यांचेही दर्शन पर्यटकांना होत आहे. उन्हाळ्यात मुंबई, महाराष्ट्रासह इतर राज्यातून तसेच परदेशातील पर्यटकही भेट देतात. शाळांना सुट्या असल्याने सध्या पर्यटनाचा हंगाम जोरात सुरू आहे.

सध्या उद्यानात वाघ, बिबट्या, पेंग्विन, अस्वल हे प्राणीदेखील पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहेत. त्यातच उद्यानातील ‘क्रॉक ट्रेल’मध्ये तीन मगर आणि दोन सुसर सोडण्यात आले आहेत. प्रशासनाने या तळ्यात मगरींसाठी आणि सुसरसाठी दोन वेगवेगळे भाग तयार केले आहेत. त्यामुळे पर्यटकांना एकाचवेळी दोन्ही प्राणी पाहण्याचा आनंद घेता येत आहे. तसेच पाण्यात पहुडलेल्या मगर आणि सुसर पर्यटक तळयाकाठी बनविलेल्या ‘डेक’वरूनही पाहू शकतात. तसेच या प्राण्यांच्या पाण्याखालील हालचालीदेखील पर्यटक टीपू शकतात.

- Advertisement -

पाणपक्ष्यांचा पिंजरा ठरतोय आकर्षण
राणी बागेत आणखी एक खास आकर्षण म्हणजे पाणपक्ष्यांसाठीचा पिंजरा. या पिंजर्‍यात पर्यटकांना स्वत: आत जाता येते. पिंजर्‍यात गेल्यावर आपल्या चोहीबाजूला पक्षी नजरेस पडतात. त्यामुळे आपण पक्ष्यांच्याच घरट्यात शिरल्याची अनुभूती पर्यटक घेत आहेत.

अंडर वॉटर आणि डेक व्ह्युविंग गॅलरी
प्राणी संग्रहालयात वाघांसाठी तयार केलेल्या काचेच्या ‘व्ह्युविंग गॅलरी’प्रमाणे दर्शनी भाग बनवण्यात आला आहे. मगरीसाठी १५०० स्क्वेअर मीटर जागा अंदाजित करून ही गॅलरी बनवण्यात आली आहे. यामध्ये जाऊन पर्यटक ‘अंडर वॉटर’ आणि ‘डेक व्ह्युविंग’ पद्धतीने मगरी, सुसरी पाहण्याचा आनंद घेत आहेत. सध्या या ठिकाणी असणाऱया मगरी, सुसरींना विविध प्रकारचे मांसाहारी खाद्य देण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -