घरमहाराष्ट्ररावसाहेब दानवे पुन्हा बोलले, 'शाहीनबाग आंदोलन हा स्टंट'!

रावसाहेब दानवे पुन्हा बोलले, ‘शाहीनबाग आंदोलन हा स्टंट’!

Subscribe

भाजपचे नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे कायम त्यांच्या वेगवेगळ्या विधानांमुळे चर्चेत आणि वादात राहिले आहेत. त्यांच्या शेतकऱ्यांसदर्भातल्या वादग्रस्त विधानामुळे देखील ते चांगलेच वादात सापडले होते. आता त्यांनी नवीन विधान केलं असून त्यावरून देखील वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ‘दिल्लीच्या शाहीनबागेमध्ये सुरू असलेल्या आंदोलनामागे आमचे राजकीय विरोधक आहेत. मुळात आंदोलकांना नागरिकत्व सुधारणा विधेयक म्हणजे सीएए नक्की काय आहे? हेच कुणी समजावून सांगितलेलं नाही. हा निवडणुकीचा स्टंट आहे’, अशी शब्दांत त्यांनी सीएएविरोधात दिल्लीच्या शाहीन बागमध्ये गेल्या ५०दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनावर टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या या विधानामुळे पुन्हा त्यांच्यावर टीका होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्र्यांच्या विधानावर पलटवार

दरम्यान, शाहीनबागविषयी बोलतानाच दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील लक्ष्य केलं आहे. उद्धव ठाकरेंनी सामनाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान पंतप्रधानांच्या बुलेट ट्रेन प्रोजेक्टवर टीका केली होती. ‘आधीच्या सरकारचे अनेक प्रकल्प पांढरे हत्ती होऊन बसलेत. आपण त्यांना स्थगिती दिली आहे. बुलेट ट्रेन हा त्यातलाच एक प्रकल्प आहे. राज्याच्या आर्थिक परिस्थितीकडे पाहून विकास प्रकल्पांची प्राथमिकता ठरवायला हवी. फक्त कुणी बिनव्याजी किंवा कमी दरानं कर्ज देतंय म्हणून ते अंगावर का घ्यायचं? आणि वर हे पांढरे हत्ती देखील पोसायचे’, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. तसेच, ‘बुलेट ट्रेन पंतप्रधानांचा ड्रीम प्रोजेक्ट असेलही. पण डोळे उघडले की स्वप्न नाही, वास्तव दिसतं. अशा प्रकल्पांमध्ये सगळ्यांना सोबत बसवून विचार व्हायला हवा’, असं देखील मुख्यमंत्री म्हणाले होते.

- Advertisement -

‘तिजोरीवर ताण येणार नाही’

मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर रावसाहेब दानवे यांनी टीका केली आहे. ‘सध्याचं सरकार हे आमच्या कामांना स्थगिती देणं इतकंच काम करत आहे. कोणतंही नवीन काम सुरू करण्यात आलेलं नाही. बुलेट ट्रेनचाचा मुद्दा असेल, तर त्यासाठी राज्याचा पैसा वापरला जात नाही. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर कोणत्याही प्रकारचा ताण येणार नाही’, असं दानवे म्हणाले आहेत.


हेही वाचा – पंतप्रधान मोदी म्हणतात, ‘शाहीनबाग आंदोलन हे नियोजित कटकारस्थान’!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -