घरताज्या घडामोडीतीन वर्षांच्या मुलीचा भाजीच्या पातेल्यात पडून मृत्यू!

तीन वर्षांच्या मुलीचा भाजीच्या पातेल्यात पडून मृत्यू!

Subscribe

मृत मुलीच्या पालकांनी स्वयंपाक घरातील आचाऱ्यावर आरोप केला आहे. तसंच शाळेच्या मुख्याध्यापकास निलंबित करण्याची मागणी डीएम सुशील पटेल यांनी केली आहे.

उत्तर प्रदेश येथील मिर्झापूर जिल्ह्यातील लालगंज भागातील रामपूर अटारी प्राथमिक शाळेत मध्यान्ह भोजन जेवणासाठी तयार केलेल्या भाजीच्या पातेल्यात पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची माहिती एका अधिकाऱ्यांने सोमवारी दिली. ही मुलगी आपल्या भावासोबत शाळेत गेली होती. या घटनेबाबत अतिरिक्त मुलभूत शिक्षा अधिकारी राममिलन यादव यांनी असं सांगितलं की, शाळेत बांधकाम साहित्य असल्यामुळे अडथळा निर्माण होऊन ती मुलगी भांड्यात पडली. या मृत मुलीचे नावं आचल असं असून तिने अंगणवाडी केंद्रात प्रवेश घेतला आहे.

ही घटना झाल्यानंतर शिक्षक आणि सर्व आचाऱ्यांनी तिला मिर्झापूर येथील प्राथमिक रुग्णालयात दाखल केले. मात्र सायंकाळी पाचच्या सुमारास तिचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. डॉक्टरांनी सांगितलं की, ती ८० टक्क्यांहून जास्त जळाल्यामुळे जखमा झाल्या आहेत. या सर्व घटनेमुळे तिच्या पालकांनी आचाऱ्यांवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे.

- Advertisement -

मिर्झापूर जिल्हा दंडाधिकारी सुशील कुमार पटेल यांनी सांगितलं की, या घटनेच्या संदर्भात शाळेचे मुख्याध्यापक संतोष कुमार यादव यांना निलंबित करण्याचे आणि चौकशीचे आदेश देण्यात आले होते. तसंच सर्व दोषींना कडक कारवाई केली जाईल आणि एफआयआर नोंदविला जाईल, असे सुशील पटेल म्हणाले.


हेही वाचा – #CAAProtest: थंडीत चिमुकल्याचा मृत्यू मात्र आई अजूनही आंदोलनावर ठाम

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -