घरमहाराष्ट्रकरोनाचे संकट तरीही कोकणचा राजा थेट ग्राहकांपर्यंत पोहचला

करोनाचे संकट तरीही कोकणचा राजा थेट ग्राहकांपर्यंत पोहचला

Subscribe

रत्नागिरी पॅटर्न आता मुंबई़-ठाण्यात कोकण कृषी विभागाचे नियोजन

आंबा म्हटलं की लहान थोर सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटते. यंदा करोनाचे संकट उभ असल्याने देशभरात लॉकडाऊन आहे. त्यामुळे कोकणातल्या हापूस आंब्याची चव चाखायला तरी मिळेल का ? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. पण चिंता करण्याचे कारण नाही. कारण, कोकण कृषी विभागाच्या पुढाकाराने थेट शेतकर्‍यांकडूनच ठाणे, मुंबईकरांना आता आंबा पाठविल्या जात आहे. आतापर्यंत कृषी विभागाकडून दोन हजार बॉक्स ग्राहकांपर्यंत पोहचविण्यात आल्या आहेत.

एकिकडे करोनाचे संकट असतानाही दुसरीकडे स्वस्तात आंबा मिळत असल्याने ग्राहकही खूश झाला आहे. बुधवारी मुलूंडच्या एका सोसायटीने १५० बॉक्स खरेदी केल्या. गृहनिर्माण सोसायटीच्या मागणीनुसारच त्यांना आंब्याचे वितरण केले जात आहे अशी माहिती जिल्हा कृषी अधिकारी अंकुश माने यांनी आपलं महानगरशी बोलताना सांगितले.

- Advertisement -

कोकणातील हापूस आंब्याला देशातच नव्हे तर परेदशातूनही मोठी मागणी हेात असते. करोनाच्या संकटामुळे देशभरात लॉकडाऊन व संचारबंदी लागू असल्याने आंब्याच्या वाहतुकीलाही ब्रेक बसला आहे.

त्यामुळे त्याचा मोठा फटका कोकणातील शेतक-याला बसणार आहे. करोनाच्या संकटामुळे कोकणातील आंबा बागायतदारांपुढे आंबा विक्रीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. आंबा उत्पादक शेतक-यांच्या डोकयावरील टेन्शन कमी करण्यासाठी व सर्वसामान्य ग्राहकांना आंब्याची अवीेट गोडी चाखता यावी यासाठी कोकण विभागीय कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे. शहरातील गृहनिर्माण सोसायटयांपर्यंत पालिका कर्मचार्‍यांच्या मध्यस्थीने आंब्याची स्वस्तात विक्री करण्यात येऊ शकते यासाठी कोकण कृषी सहसंचालक विकास पाटील यांनी ठाणे व मुंबई महापालिकेच्या आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला होता. रत्नागिरी जिल्हयातील कर्मचा-यांनी आपल्या गावाकडे अशा पध्दतीने आंबा थेट विक्री केली होती त्याच धर्तीवर हे नियोजन करण्यात येणार असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केलं होतं.

- Advertisement -

कोकण कृषी विभागाच्या नियोजनाला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. कृषी विभागाकडून गृहनिर्माण संस्थांची यादी घेऊन त्यांना आवाहन केले होते. त्यानुसारच त्यांच्या मागणीनुसार शेतकर्‍यांकडून आंबा घेऊन त्यांच्यापर्यंत पेाहोचवला जात आहे. रत्नागिरी कृषी विभाग प्रकल्प संचालक गुरूदत्त काळे, तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे आणि कृषी सहायक नाळे आणि ठाणे कृषी विभाग यांच्या समन्वयातून हा शेतकर्‍यांकडून हा आंबा थेट ग्राहकांपर्यंत पोहचवला जात आहे असे माने यांनी सांगितले. सध्या नागरिकांना साडेतीनशे रूपये डझनने आंबा मिळत आहे.

एका पेटीत चार डझन आंबे असतात त्यामुळे एक पेटी दीडशे रूपयाला मिळत आहे, त्याच पेटीची किंमत तीन ते चार हजार रूपये आहे त्यामुळे ग्राहकांना स्वस्तात आंबा मिळत आहे असे जिल्हा कृषी अधिकारी माने यांनी सांगितलं. करोनाचे संकट असतानाही शेतकर्‍यांवरी आर्थिक संकटावर मात करून ग्राहकांपर्यंत थेट आंबा पेाहचविला जात असल्याने कृषी विभागातील अधिकार्‍यांचे कौतूक होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -