घरताज्या घडामोडीMPSCच्या आधी झालेल्या भरती प्रक्रियेत मराठा समाजाच्या उमेदवारांसाठी असलेली वयोमर्यादा कायम ...

MPSCच्या आधी झालेल्या भरती प्रक्रियेत मराठा समाजाच्या उमेदवारांसाठी असलेली वयोमर्यादा कायम राहणार

Subscribe

SEBC उमेदवारांनी अराखीव पदाकरता असलेली वयाची मर्यादा ओलांडली असल्यास त्यांना देय असलेली वयोमर्यादा आणि परीक्षा शुल्काची सवलत आधीप्रमाणे कायम ठेवावी

MPSCच्या आधी झालेल्या भरती प्रक्रियेत मराठा समाजाच्या उमेदवारांसाठी असलेली ४३ वर्षे ही वयोमर्यादा कायम राहणार असल्याचे राज्य शासनाने MPSCला कळविले आहे. ( recruitment process conducted before MPSC, the age limit for Maratha community candidates will remain the same)  सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर MPSCने विविध मुद्द्यांसाठी राज्य शासनाकडून सल्ला मागितला होता. मागासवर्गीय उमेदवार त्यांच्या देय वयोमर्यांदेचा फायदा घेऊन मूळ परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेसासाठी पात्र ठरलेल्या सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असलेल्या उमेदवारांविषयी काय निर्णय घ्यायचा असे MPSC राज्य शासनाला विचारले होते. त्यावर उत्तर देत राज्य शासनाने SEBC उमेदवारांनी अराखीव पदाकरता असलेली वयाची मर्यादा ओलांडली असल्यास त्यांना देय असलेली वयोमर्यादा आणि परीक्षा शुल्काची सवलत आधीप्रमाणे कायम ठेवावी असे राज्य शासनाकडून सांगण्यात आले.

SEBC प्रवर्गासाठी राखीव असलेली पदे खुल्या आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गात रुपांतर करु मुख्य परीक्षेचा निकाल सुधारित करुन फक्त नवीन उमेदवरांच्या मुलाखती घ्यावात आणि अपात्र उमेदवरांना यातून वगळ्यात यावे असे राज्य शासनाकडून सांगण्यात आले आहे. SEBC प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवाराकडून पर्याय घेऊन पर्यायानुसार ईडब्ल्यूयूएसमधून नियुक्ती करण्याची शिफारस करावी. MPSEने सुधारित नियमांनुसार कार्यवाही करुन त्यानुसार मुख्य परीक्षेचा निकाल सुधारीत करुन मुलाखती घ्यावात. SEBC प्रवर्गासाठी राखीव असलेल्या खुल्या व ईडब्ल्यूयूएस प्रवर्गाची पर्याय घेऊन चाळणी परीक्षेचा निकाल सुधारित करुन नंतर मुलाखती घ्याव्यात असे राज्य शासनाकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

ईडब्ल्यूयूएस प्रवर्गाचा पर्याय घेऊन मुख्य परीक्षेचा निकाल सुधारित करुन शारीरिक चाचणी घ्यावी. SEBC उमेदवरांना खुल्या व ईडब्ल्यूयूएस प्रवर्गाची पर्याय घेऊन पूर्वपरीक्षेचा निकाल सुधारित करुन मुख्य परीक्षा घ्यावी त्याचप्रमाणे SEBC प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांकडून खुल्या व ईडब्ल्यूयूएस प्रवर्गाचा पर्याय घेऊन पूर्वपरीक्षा घ्यावी असे राज्य शासनाकडून सांगण्यात आले.


हेही वाचा – भाजपवर संभाजीराजे नाराज; आरक्षणप्रश्नी भूमिकेवर पक्षाकडून संशय घेतल्याने वेगळ्या वाटेवर

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -