घरमहाराष्ट्रपुणेराज्यातील 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी; कोल्हापूरातील राधानगरी धरण भरले

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी; कोल्हापूरातील राधानगरी धरण भरले

Subscribe

कोल्हापूरात पावसाचा जोर कायम असल्यामुळे कोल्हापूरातील राधानगरी धरण हे 100 टक्के भरले

मुंबई | राज्यतील विविध भागात जोरदार पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळे राज्यातील रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील काही नद्यांना पूर आला आहे. तर काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शाळा ही सुट्ट्या दिल्या आहेत. तर नदी काठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात पावसाचे उशीरा आगमन झाले असले, तरही जुलै महिन्यात पावसाची जोरदार बँटिंग सुरू आहे.

हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भात मुसळधार पाऊसाचा इशारा दिला आहे. यात कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, गडचिरोली, गोंदिया आणि नांदेड या जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.

- Advertisement -

कोल्हापूरात मुसळधार पाऊस; राधानगरी धरण भरले

कोल्हापूरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. अजूनही कोल्हापूरात पावसाचा जोर कायम आहे. यामुळे कोल्हापूरातील राधानगरी धरण हे 100 टक्के भरले असून धरणाचे स्वचलित दरवाजे कोणत्याही क्षण उघडले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या पंचगांगा नदी ही40 फुट 5 इंचाने वाहत असून जिल्ह्यातील 80 बंधारे हे पाण्याखाली गेले आहेत. या पार्श्वभूमीवर 28 गावातील शाळांना आजपासून सुट्टी दिली आहे.

- Advertisement -

मुंबईला पाणीपुरवठा करणारे दोन धरण भरले

मुंबई, ठाणे आणि पालघरला आज हवामान विभागाने आरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबई आणि ठाण्यात जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे सखल भागात पाणी साचले असून याचा परिणाम हा वाहतुकीवर झाल्याचे दिसून येते. तर मुंबईतील अंधेरी सबवेमध्ये पाणी भरल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्याचबरोबर मुंबईला पाणीपुरवठा करणारे तुळसी आणि तानसा धरण पूर्ण क्षमतेने भरले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -