घरमहाराष्ट्रइंजेक्शन चोर भाजप नेते आणि ब्रूक फार्मा कंपनीवर तात्काळ खटला दाखल करा;...

इंजेक्शन चोर भाजप नेते आणि ब्रूक फार्मा कंपनीवर तात्काळ खटला दाखल करा; सचिन सावंत यांची मागणी

Subscribe

रेमडेसिवीर इंजेक्शनचा वाद तापणार असल्याची चिन्हं आहेत. भाजपचे नंदुरबारचे नेते शिरीष चौधरी यांच्या हॉटेलमध्ये रेमडेसिवीरचा साठा करण्यात आल्याचा आरोप अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला. यानंतर आता काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजप नेते आणि ब्रुक फार्मा कंपनीवर तात्काळ खटला दाखल करा, अशी मागणी केली. काही दिवसांपूर्वी शिरीष चौधरी यांनी अंमळनेर आणि नंदुरबारला हजारो रेमडेसीवीर इंजेक्शन वाटले होते.

सचिन सावंत यांनी शिरीष चौधरी यांचा इंजेक्शन वाटतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. “इंजेक्शन चोर भाजप नेते आणि ब्रूक फार्मा कंपनीवर तात्काळ खटला दाखल करावा. ८ एप्रिल व १२ एप्रिलला भाजपचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी अंमळनेर व नंदुरबारला हजारो रेमडेसीवीर इंजेक्शन वाटले. हा साठा पूर्णपणे निर्यातीसाठी होता. राज्याची बंदी असताना औषध खाजगी रित्या कशी वाटली?” असा सवाल सचिन सावंत यांनी केला आहे.

- Advertisement -

- Advertisement -

“ब्रूक फार्मा कंपनी म्हणते दमण प्रशासनाने तीला महाराष्ट्रात वितरण करण्यास परवानगी दिली नाही मग महाराष्ट्रात हा साठा आला कसा? फडणवीस व दरेकर यांना मार्ग दाखविणारे‌ शिरीष चौधरी दरेकर व लाड यांच्या बरोबर दमणला गेले होते. लोकांकडून अनधिकृत पणे पैसे घेतले गेले. हे भयानक आहे,” असं सचिन सावंत म्हणाले. तसंच डीसीपी मंजूनाथ सिंगे यांनी योग्य कारवाई केली होती. भाजप नेत्यांचे व ब्रूक फार्मा कंपनीचे रेमडेसीवीरच्या काळाबाजारात संगनमत होते. तात्काळ कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली.

 

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -