घरमहाराष्ट्रशनिवार वाडा परिसरातील दर्गा हटवा, ब्राह्मण महासंघ आक्रमक

शनिवार वाडा परिसरातील दर्गा हटवा, ब्राह्मण महासंघ आक्रमक

Subscribe

पुणे – पुण्यातील शनिवार वाडा परिसरात असलेला दर्गा (Dargah in Shanivar Wada Area) काढून टाकण्याची मागणी सध्या जोर धरते आहे. यामुळे महाराष्ट्रात आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. दर्गा काढून न टाकल्यास कोर्टात जाण्याचा इशारा ब्राह्मण महासंघाने दिला आहे. (Remove Dargah from Shaniwar Wada area, Brahmin mahasangh aggressive)

हेही वाचा – विशेष : प्रेमविवाहानंतर ड्रग्सची सक्ती, लैंगिक अत्याचार; तरुणी आता मनोरुग्ण

- Advertisement -

शनिवार वाडा परिसरात हजरत शाह ख्वाजा सैयद शाह पीर मुकबुल हुसेन अशा नावाचा दर्गा आहे. या दर्गाविरोधात ब्राह्मण महासंघ आक्रमक झाला आहे. शनिवार वाड्याच्या ऐतिहासिक दस्तऐवजानुसार याठिकाणी असा कोणताही दर्गा होता याचा दाखला नाही, असा दावा ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी केला आहे.

१२३३ साली असा कोणी पीर बाबा पुण्यात आल्याचा कोणताही उल्लेख सापडत नाही. शनिवार वाड्याच्या भूमीपूजनापासून ते वास्तू आणि इथल्या प्रत्येक घटनेची इतिहास उपलब्ध आहे. परंतु, यात कुठेही या दर्ग्याचा उल्लेख आढळत नाही. त्यामुळे हा दर्गा फार नंतर बांधण्यात आला आहे, असंही दवे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – पाच-सहा फुटांवर मुख्यमंत्री होते, विनयभंगासंदर्भात खुलासा करावा; अजित पवारांचा शिंदेंवर पलटवार

याबाबत अनेकवेळा पुरातत्व खात्याला पत्रव्यवहार केला. मात्र, त्यांनी दखल घेतली नाही. राज्य सरकारला सर्व माहित असतं. येत्या १५ दिवसांत समाधानकारक उत्तर मिळालं नाहीतर कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचीही माहिती दवे यांनी दिली.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -