घरमनोरंजनमुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाचा ऐश्वर्याचा फोटो व्हायरल; नेटकऱ्यांनी केले ट्रोल

मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाचा ऐश्वर्याचा फोटो व्हायरल; नेटकऱ्यांनी केले ट्रोल

Subscribe

या फोटोत ऐश्वर्या तिच्या मुलीला म्हणजेच आराध्याला लीप किस करताना दिसत आहे.

बॉलिवूड (bollywood) मधील लोकप्रिय आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या राय – बच्चन (aishwarya rai-bachchan). ऐश्वर्याचे अनेक चाहते सुद्धा आहेत. ऐश्वर्या नेहमी तिचे आणि तिच्या मुलीचे म्हणजेच आराध्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे चाहते सुद्धा तिच्या फोटोवर प्रतिक्रिया देत असतात. ऐश्वर्या आणि तिच्या मुलीचा म्हणजेच आराध्याचा एक फोटो सध्या चर्चेत आला आहे. पण याच फोटोवरून ऐश्वर्याला नेटकऱ्यांकडून ट्रोल करण्यात येत आहे.

- Advertisement -

ऐश्वर्याच्या या फोटोवर काही जण चांगल्या प्रतिक्रिया देत आहेत तर काही जण तिला ट्रोल करत आहेत. ऐश्वर्यच्या या फोटोवरून सध्या चर्चांना उधाण आले आहे. आज 16 नोव्हेंबर रोजी ऐश्वर्याची मुलगी आराध्या हीच 11 वा वाढदिवस आहे.. आराध्याच्या वाढदिवसाचे (aaradhy bachchan birthday) सेलिब्रेशन रात्री 12 वाजता करण्यात आले. त्याचाच एक फोटो ऐश्वर्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत ऐश्वर्या तिच्या मुलीला म्हणजेच आराध्याला लीप किस करताना दिसत आहे. हा फोटो ऐश्वर्याने सोशल मीडियावर शेअर करत त्याला my love… my life… i love you, my aaradhya असे कॅप्शन सुद्धा ऐश्वर्याने दिले आहे. याच फोटोवर नेटकऱ्यांनी ऐश्वर्याला ट्रोल केले आहे.

 ऐश्वर्याच्या या फोटोवर तिचे चाहते आई आणि मुलीचे जे प्रेम दिसते आहे त्याचे कौतुक करत आहेत तर दुसरीकडे मात्र काही जण ही आपली संस्कृती नाही असे म्हणत आहेत. तर काही जण असे म्हणत आहेत की आई मुलीला लीप किस करते ही काही आपली संस्कृती नाही. तर एकाने कमेंटमध्ये असे म्हटले आहे की तू तुझ्या मुलीला लीप किस करत आहेस तर ठीक आहे पण असे फोटो सोशल मीडियावर शेअर करायची काय गरज होती अश्या प्रतिक्रिया ऐश्वर्याच्या फोटोवर येत आहेत.

- Advertisement -

हे ही वाचा – बिपाशाला रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, चिमुकलीचे घरी जोरदार स्वागत

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -