घरताज्या घडामोडीधनंजय मुंडेंना मोठा दिलासा; रेणू शर्माने बलात्काराची तक्रार घेतली मागे

धनंजय मुंडेंना मोठा दिलासा; रेणू शर्माने बलात्काराची तक्रार घेतली मागे

Subscribe

डी.एन पोलीस ठाण्यातील धनंजय मुंडेंविरोधातील तक्रार मागे

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंना मोठा दिलासा मिळाला आहे. धनंजय मुंडेंविरोधातील बलात्काराची तक्रार आता पीडित महिला रेणू शर्माने मागे घेतली आहे. रेणू शर्माने निवेदन देऊन हे आमचे घरगुती प्रकरण असून थोडा वाद झाल्यामुळे ही तक्रार केली होती. पण याप्रकरणाला राजकीय वळण लागल्यामुळे बलात्काराची तक्रार मागे घेत असल्याचे रेणूने सांगितले. त्यामुळे आता रेणू शर्माने डी.एन पोलीस ठाण्यातील धनंजय मुंडेंविरोधातील तक्रार मागे घेतली आहे.

जर एखाद्या महिलेने तक्रार दाखल केली असेल तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्या महिलेची दखल घेऊन तात्काळ गुन्हा दाखल करावा लागतो. मग हा गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित कलमानुसार आरोपीवर कारवाई होत असते. त्यामुळे रेणू शर्माच्या गंभीर आरोपानुसार गुन्हा दाखल होऊन धनंजय मुंडेंवर कारवाई झाली असती. पण आता हा गुन्हा दाखल झाला नाही आहे. कारण रेणू शर्माने धनंजय मुंडेंविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे.

- Advertisement -

‘खऱ्या पीडितांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल’

ज्यावेळी सुरुवातील धनंजय मुंडे यांच्या आरोप झाला, ते आमच्यासाठी धक्कादायक होत. तसेच आज रेणू शर्माने तक्रार मागे घेतली, हेही आमच्यासाठी तितकच धक्कादायक आहे. याप्रकरणात पोलिसांनी निपक्षपणे तपास करून सत्य समोर आणावे आणि जे कोणी आरोपी आहे, त्यांना शिक्षा व्हावी, असे आमचे मत होते. रेणू शर्माने ज्यामुळे तक्रार मागे घेतली आहे, ते अत्यंत चुकीचे आहे. आता या रेणूला शिक्षा होणे गरजेचे आहे. कारण हा काही खेळ नाही आहे, कोणीही उठाव आणि कोणावरही बलात्कारसारखे गंभीर आरोप करावा. हा त्यांच्यासाठी खेळ असून शकतो आमच्यासाठी निश्चितच नाही. त्यामुळे आता ज्या खऱ्या पीडित महिला आहेत, त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल. त्यामुळे आम्ही त्याचवेळी म्हणालो होतो की, जर रेणू शर्मा चुकीची असेल तर तिच्याविरोधात कारवाई व्हावी आणि धनंजय मुंडे आरोपी आढळले तर त्यांच्यावर कारवाई व्हावी. पण आता गंभीर आरोप करून माघार घेणे, हे योग्य नाही आहे. रेणूवर कारवाई होणे क्रमप्राप्त आहे आणि जर असे झाले नाही तर ज्या खऱ्या पीडित महिला आहेत, त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल. – चित्रा वाघ, भाजप नेत्या

‘रेणू शर्माने केलेली तक्रार खोटीच होती’

धनंजय मुंडे यांना निश्चितच मोठा दिलासा मिळाला आहे. आम्हाला माहित होत की, ही तक्रार जाणूनबुजून या दोन्ही बहिणींनी ब्लॅकमेलिंग करायच, पैसा उकळायचा आणि बदनाम करायच, कोणाच तरी राजकीय जीवन संपवून टाकायच यासाठी केली असेल. रेणूने केलेली तक्रार खोटीच होती. महिल्यांच्या तक्रारी घेत नाहीत, असे जे कोणी सांगतंय. ते सगळं खोट आहे. महाराष्ट्रात असे होत नाही. महाराष्ट्रात आज कायद्याचं राज्य आहे. इथे न्याय मिळातो. धनंजय मुंडे यांच्याबाबतीत घडलेलं पूर्णपणे खोट होत. – विद्या चव्हाण, काँग्रेस नेत्या 


हेही वाचा – रेणू शर्माच्या हनी ट्रॅपमध्ये आता चौथा इसम

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -