घरताज्या घडामोडीअहमदनगरमध्ये घरावर दरोडा, ७ तोळ्याचे दागिने लंपास; महिला जखमी

अहमदनगरमध्ये घरावर दरोडा, ७ तोळ्याचे दागिने लंपास; महिला जखमी

Subscribe

अहमदनगरमध्ये नेवासा येथे संत ज्ञानेश्वर महाविद्यालयासमोर राहत असलेले माजी प्राचार्य रघुनाथ आगळे यांच्या घरी दरोडा पडल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी मुख्य दरवाजा तोडून घरामध्ये प्रवेश करीत तब्बल सात तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरुन नेले आहेत. ही घटना गणपतीच्या आगमनाच्या दिवशी पहाटेच्या वेळेस घडली आहे. यासंदर्भात कौशल्या रघुनाथ आगळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून नेवासा पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी घरातील एका महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी धारदार शस्त्राने कापण्याचा प्रयत्न केला. यामध्ये संबंधित महिलेला हाताला जखम देखील झाली आहे.

दरोड्यात महिला जखमी

कौशल्या आगळे यांच्या घरात शनिवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात पाच आरोपींनी दरवाजा तोडून घरामध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी कौशल्या आगळे यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण जबरदस्तीने काढून घेतले. तसेच कौशल्या आगळे यांच्या हातातील बांगडी काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही बांगडी निघाली नाही. त्यामुळे त्यांनी धारदार शस्त्राने बांगडी कापण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आगळे यांच्या हाताला जखम झाली. त्यांनी आरडाओरड केला त्यावेळी चोरट्यांनी घटनास्थळावरुन सोन्याचे दागिने घेऊन पळ काढला. याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर करीत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांसह २३ काँग्रेस नेत्याचं सोनिया गांधींना पत्र


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -