घरताज्या घडामोडी'तुमचं नाव माझ्या ह्रदयात कोरलेलं राहील' रुपाली पाटील यांचा मनसेला रामराम, राष्ट्रवादीत...

‘तुमचं नाव माझ्या ह्रदयात कोरलेलं राहील’ रुपाली पाटील यांचा मनसेला रामराम, राष्ट्रवादीत करणार प्रवेश

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यापुर्वीच मनसेला पुण्यात मोठा झटका बसला आहे. पुण्यातील मनसेच्या आक्रमक आणि डॅशिंग नेत्या म्हणून ओळख असलेल्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी मनसेला अखेर रामराम केला आहे. रुपाली पाटील या मनसेतून बाहेर पडणार याबाबत काही दिवसांपुर्वीपासून चर्चा सुरु होती. अखेर त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसेच एक पत्र लिहिले आहे ज्यामध्ये राज ठाकरे तुमचं नाव माझ्या ह्रदयात कोरलेलंल राहील असे लिहिले आहे. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीआधीच रुपाली पाटील यांनी राजीनामा दिल्यामुळे मनसेला मोठा धक्का बसला आहे.

पुण्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे आज पुण्यात दाखल होणार आहेत. त्यापुर्वीच मनसेच्या महिला पदाधिकारी आणि डॅशिंग नेत्या रुपाली पाटील यांनी राजीनामा दिला आहे. राज ठाकरेंच्या दौऱ्याआधीच हा राजीनामा दिल्यामुळे चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांनी राज ठाकरे यांना देखील एक भावनिक पत्र लिहिलं आहे. पुण्यात मनसेमध्ये पक्षांतर्गत कलहावरुन रुपाली पाटील यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच त्यांनी पक्ष सोडण्याचे संकेतही दिले होते.

- Advertisement -

रुपाली पाटील मनगटावर घड्याळ बांधणार

रुपाली पाटील यांनी काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. या भेटीवर चर्चा सुरु होत्या तेव्हा वैयक्तिक भेट असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले होते. कोरोना काळातील बैठकांमध्येही रुपाली पाटील उपस्थित होत्या यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये बुधवारी रुपाली पाटील राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश करण्याची शक्यता आहे.

तुमचं नाव ह्रदयात कायम कोरलेलं राहिल

मनसे नेत्या रुपाली पाटील यांनी राजीनामा दिल्यावर एक भावनिक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी म्हटलं आहे की, मनसेमधील सर्व पदांसह सदस्य पदाचा राजीनामा देत आहे. आपण दिलेलं बळ नेहमी संघर्ष करण्याची प्रेरणा देत राहील. राज ठाकरे हे नाव माझ्या ह्रदयात कोरलेले कायम राहिल.

- Advertisement -

कोण आहेत रुपाली पाटील?

रुपाली पाटील ठोंबरे या मनसेच्या पुण्यातील आक्रमक आणि डॅशिंग नेत्या आहेत. त्यांनी महिला आणि युवक तसेच युवतींच्या प्रश्नांवर आक्रमक काम केली आहेत. मनसेमध्ये आल्यानंतर त्यांनी विद्यार्थी सेनेच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली आहे. महिला शहराध्यक्ष होत्या तसेच त्या मनसेत येण्यापुर्वी माजी नगरसेविका होत्या.

राजीनाम्यानंतर संदीप देशपांडेंच ट्वीट

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी रुपाली पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर ट्वीट केलं आहे. सूर्य तळपतील चंद्र झळकतील, तारे अपुला क्रम आचरतील, असेच वारे पुढे वाहतील,जन पळभर म्हणतील, ‘हाय हाय’ अशा आशयाचे ट्विट संदीप देशपांडे यांनी केलं आहे.


हेही वाचा : राज ठाकरेंची पक्षबांधणी औटघटकेची नसावी!


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -