घरमहाराष्ट्रसापांना पाळणारी शाळा!

सापांना पाळणारी शाळा!

Subscribe

समाजात सापांविषयी असणारी अंधश्रद्धा आणि गैरसमज दूर करण्याच्या या हेतूने सर्पमित्र  बाबुराव टक्केकर यांनी १९७२ साली सर्पशाळा सुरु केली. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच सापांविषयीचे ज्ञान देखील या ठिकाणी दिले जाते

साप पाहिला तरी अनेकांची बोबडी वळते पण कोल्हापुरातील चंदगड तालुक्यात असणारे मामासाहेब लाड विद्यालय मात्र याला अपवाद आहे.कारण या शाळेत चक्क साप पाळले जातात. इयत्ता पाचवीपासून बारावीपर्यंत असणाऱ्या या शाळेने सर्पशाळा म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. सर्पमित्र कै. बाबुराव टक्केकर यांनी १९७२ साली समाजात सापांविषयी असणारे गैरसमज आणि अंधश्रद्धा दूर व्हावेत म्हणून शाळेतच साप पाळण्याचा अनोखा उपक्रम सुरु केला. विशेष म्हणजे पाठ्यपुस्तकातील ज्ञानाबरोबरच विद्यार्थांना सापांबद्दलचं ज्ञान मिळणं गरजेचे आहे कारण साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे हा संदेश पोहोचवण्याचे काम बाबुराव टक्केकर यांनी शेवटपर्यंत केले. सुरुवातीला स्थानिकांच्या विरोधाला झुगारुन सापांना वाचवण्याची घेतलेली ही मोहीम आज सर्वदूर पोहोचली आहे. शेतकऱ्यांना विषारी आणि बिनविषारी सापांची ओळख नसते त्यामुळे कित्येक सापांना मारले जाते. पण शेतकऱ्यांना सापांच्याबद्दलची माहिती दिल्यास सापांना वाचवण्यात यश येऊ शकते हे जणू त्यांनी सिद्ध करुन दाखवले आहे.

नागपंचमीला भरते सापांचे प्रदर्शन.

शाळेत शिकणारे ५ वी ते १२ वी पर्यंतचे सर्व विद्य़ार्थी समोर साप दिसताच तो कोणत्या जातीचा आहे हे ओळखु शकतात. दरवर्षी नागपंचमीला या शाळेत सापांचे मोठे प्रदर्शन भरवले जाते ज्या प्रदर्शनामध्ये सापाच्या प्रत्येक जातीविषयी इत्यंभुत माहीती देण्याचे काम केले जाते. या शाळेत पेशाने शिक्षक असणारे बरेच शिक्षक स्व:त सर्पमित्र आहेत

- Advertisement -

घोणस सापांकडून ९६ पिल्लांना जन्म

कोल्हापूरातील याच सर्पशाळेत घोणस जातीच्या तीन विषारी सापाच्या मादींनी 96 पिल्लांना जन्म दिला आहे. या तिनही मादींनी चार,आठ दिवसाच्या फरकांनी प्रत्येकी २० ते ४०  पिल्लांना जन्म दिला आहे. साधारण एप्रिल महिना हा सापांचा मिलनाचा काळ असतो आणि पुढे तीन साडे तीन महिन्यात मादी पिल्लांना जन्म देते. घोणस हा अतिविषारी सापांच्या यादीत गणला जातो. त्यातच कोल्हापूरात एकाचवेळी ३ मादींनी  एवढ्या पिल्लांचा जन्म होणे ही घटना दुर्मिळ आहे. आता या सापांच्या पिल्लांना जंगलात सोडण्यात आले आहे.

mamasaheb lad school
मामासाहेब लाड विद्यालय, ढोलगरवाडी, कोल्हापूर

 

- Advertisement -

वेगवेगळ्या जातींचे साप

सर्पशाळेत वेगवेगळ्या जातीचे साप आहेत. हरणटोळ, पाण्याळी, मण्यार, घोणस, नाग आणि अजगर या सारख्या जातीचे साप या ठिकाणी आहेत.सापांची काळजी घेण्यासाठी या ठिकाणी विशिष्ट पद्धतीच्या टाक्या बनवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये या सापांना ठेवले जाते आणि त्यांची योग्य ती काळजी घेतली जाते.

 

वनविभागाची मान्यता असलेली ही सर्पशाळा आहे. विशेष म्हणजे मुलांना शैक्षणिक ज्ञानासोबतच सापांचे धडे देणारी ही देशातील पहिलीच ‘सर्पशाळा’ आहे. शाळेचे ब्रीदवाक्यच ‘सापही राष्ट्रीय संपत्ती ‘असे असल्यामुळे  शाळेच्या माध्यमातून सापांविषयी असलेले गैरसमज दूर केले जातात.

व्ही.आर.पाटील, सर्पमित्र.

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -