घरताज्या घडामोडीSambhaji Bhide : 15 ऑगस्ट हा काळा दिवस..., संभाजी भिडेंचं पुन्हा एकदा...

Sambhaji Bhide : 15 ऑगस्ट हा काळा दिवस…, संभाजी भिडेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य

Subscribe

शिवप्रतिष्ठान संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. महिला पत्रकाराला कुंकू लाव तरच तुझ्याशी बोलेन, असं म्हणत पत्रकार महिलेशी बोलण्यास नकार दिला होता. त्यावरून राजकीय वातावरण तापलं होतं. परंतु 15 ऑगस्ट हा काळा दिवस म्हणत संभाजी भिंडेंनी राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वजावरही भाष्य केलं आहे. त्यामुळे भिडे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.

15 ऑगस्ट हा काळा दिवस…

पुण्यातील दिघी येथे 25 जूनला संभाजी भिडेंचे जाहीर व्याख्यान होते. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेने आयोजन केले होते. यामध्ये बोलताना संभाजी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. जन गण मन हे राष्ट्रगीत होऊ शकत नाही. कारण रवींद्रनाथ टागोर यांनी ते 1898 ला इंग्लंडच्या राजाच्या स्वागतासाठी लिहिले होते. 15 ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्य दिवस नाही. या दिवशी भारताची फाळणी झाली. या दिवशी सर्वांनी उपवास करावा आणि दुखवटा पाळावा, असं संभाजी भिडे म्हणाले.

- Advertisement -

आपली स्वातंत्र्य देवता जोधाबाई सारखी

भारताचा राष्ट्रध्वज जोपर्यंत भगवा म्हणून स्वीकारला जात नाही, तोपर्यंत शांत बसायचं नमस्कार नाही. आपली स्वातंत्र्य देवता जोधाबाई सारखी मुसलमानांच्या जनानखान्यातील बटीक नसेल तर ती सीतेसारखी पतिव्रता असेल, असे भिडे म्हणाले.

हे स्वातंत्र्य अखंड भारताचे नाही – देवेंद्र फडणवीस

15 ऑगस्ट 1947 मिळालेले स्वातंत्र्य हे खरे स्वातंत्र्य नाही. तो काळा दिवस आहे, असे वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले. त्यावर फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली. आता मिळालेले स्वातंत्र्य हे राजकीय स्वातंत्र्य आहे. फाळणी झाली त्यामुळे त्यावेळी मिळालेले स्वातंत्र्य हे अखंड भारताचे स्वातंत्र्य नव्हते. पण 15 ऑगस्ट 1947 रोजी मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नाही, असं कोणी म्हणत असेल तर ते चुकीचं आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

- Advertisement -


हेही वाचा : Devendra Fadnavis : सत्य कसं बदलणार; देवेंद्र फडणवीस यांचा शरद पवारांवर पलटवार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -