घरमहाराष्ट्रसंभाजी महाराजांना श्रेष्ठत्व देण्यात महाराष्ट्र कमी पडला

संभाजी महाराजांना श्रेष्ठत्व देण्यात महाराष्ट्र कमी पडला

Subscribe

डॉ. अमोल कोल्हे यांची खंत

छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली आणि पराक्रमी इतिहास सर्वार्ंनाच माहिती आहे. मात्र निधड्या छातीच्या छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या पराक्रमाचे श्रेय देण्यात महाराष्ट्र कुठे तरी कमी पडला की काय, असा प्रश्न मनात येतो,अशी खंत सुप्रसिद्ध अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली.

दिशा सोशल फाउंडेशनच्या वतीने आहेर गार्डन येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी मुलाखतीच्या माध्यमातून शिवाजी महाराज फेम शंतनु मोघे, संभाजी महाराज फेम डॉ. अमोल कोल्हे, सोजल सावंत, मालिकेचे दिग्दर्शक कार्तिक केंढे यांच्याशी मुक्त संवाद साधला.

- Advertisement -

छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी लहानपणापासूनच प्रचंड कुतूहल,आकर्षण आणि प्रचंड अभिमान होता.संभाजी महाराजांची भूमिका साकारायची हे महाविद्यालयापासूनचे स्वप्न होते. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून वाट काढत हे स्वप्न पूर्णत्वाला आले आहे. त्या अडचणींचे कोणतेही भांडवल करायचे नाही.या विषयासाठी पूर्णपणे वाहून घेतले आहे,असे प्रतिपादन अमोल कोल्हे यांनी केले.

ज्या लढवय्या राजाच्या बलिदानानंतरही दीर्घ काळ रयतेने लढा दिला तो राजा असामान्यच होता.आज या मालिकेच्या माध्यमातून संभाजी राजांचा खरा इतिहास आम्ही मांडत आहोत. जगभरात सोळा कोटी लोक ही मालिका पाहत आहेत. प्रेक्षकांनी अक्षरशः ही मालिका डोक्यावर घेतली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -