घरमहाराष्ट्रसुरक्षा धोरण आणणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य - संभाजी पाटील-निलंगेकर

सुरक्षा धोरण आणणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य – संभाजी पाटील-निलंगेकर

Subscribe

सुरक्षा धोरण आणणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे, असे राज्याचे कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर म्हणाले आहेत. कामगारांना कामासाठी पुरक वातावरण मिळावे, यासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे.

कामाच्या ठिकाणी सुरक्षा, आरोग्य आणि वातावरण याबाबतची कटिबद्धता पाळून सुरक्षित आणि आरोग्यदायी असे कामगारांना पुरक कामाचे ठिकाण उपलब्ध व्हावे, याकरिता महाराष्ट्र शासन कामगार विभाग, औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालय यांच्यावतीने कारखान्यात कामाच्या ठिकाणी सुरक्षा, आरोग्य आणि वातावरणाबाबत धोरण निश्चित करण्यात येणार आहे. अशाप्रकारचे धोरण आणणारे देशात प्रथमच महाराष्ट्र राज्य होणार आहे, अशी ग्वाही राज्याचे कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी आज बैठकीदरम्यान दिली. सुरक्षा, आरोग्य आणि वातावरणाबाबत राज्य शासनाच्यावतीने धोरण निश्चित करण्यासाठी कामगार विभागाच्या वतीने कामगार मंत्री यांच्या अध्यक्षतेत सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीस कामगार विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, अग्नीशमन विभाग, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, माहिती व तंत्रज्ञान विभाग आणि इतर विभागाचे अधिकारी उपस्थीत होते.

काय म्हणाले निलंगेकर?

महाराष्ट्र शासन हे कामगारांकरीता सुरक्षित कामाचे ठिकाण आणि आरोग्यास प्रोत्साहन देणारे प्रमुख राज्य म्हणुन ओळखले जावे, असे प्रतिपादन निलंगेकर यांनी या बैठकीत केले. यापुर्वी कामगार मंत्री यांनी हिवाळी अधिवेशन २०१७ मधील सभागृहात प्रश्नोत्तरादरम्यान राज्यात कामाच्या ठिकाणी सुरक्षा, आरोग्य आणि वातावरणाबाबत स्वतंत्र धोरण तयार करणार असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार त्वरीतच हे सुरक्षा धोरण राज्यात जाहीर होणार असून याबाबतचा कृती आराखडा औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालयाने तयार केला आहे. याबाबत त्वरीत सर्व विभागांमार्फत सूचना घेऊन अंमलबजावणी करून सुरक्षा धोरण निश्चीत करण्यात येणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘बांधकाम कामगारांनी नोंदणी करण्यासाठी पुढे यावे’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -