घरताज्या घडामोडीराहुल गांधींच्या भेटीवर पवारांना शंका नाही, सर्व घडामोडी उद्धव ठाकरेंच्या आदेशाने- संजय...

राहुल गांधींच्या भेटीवर पवारांना शंका नाही, सर्व घडामोडी उद्धव ठाकरेंच्या आदेशाने- संजय राऊत

Subscribe

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. राहुल गांधी यांच्या भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना काही शंका नाही. तसेच शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानेच भेटीगाठी आणि घडामोडी होतात असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. काँग्रेसशिवाय आघाडी निर्माण न करता जी आघाडी आहे. तीच सक्षम करण्यावर भर असल्याचे संजय राऊतांनी म्हटलं आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, राहुल गांधी यांची नेहमीच भेट होत असते. महाराष्ट्राच्या घडामोडींसंदर्भात राहुल गांधी माहिती घेत असतात. प्रियांका गांधी यांची प्रथमच राजकीय घडामोडींसदर्भात भेट घेत आहे. त्या काँग्रेसच्या महासचिव आहेत त्यांनी भेटीची इच्छा व्यक्ती केली. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे. बुधवारी त्यांना भेटणार असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत.

- Advertisement -

काँग्रेस नेत्यांच्या भेटीची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिली होती. मी शिवसैनिक आहे त्याच्यामुळे आम्ही जे काही करतो आहोत हे त्यांच्या आदेशानुसार करत असतो. ज्या घडामोडी होतात आणि ज्यामध्ये आम्ही सहभागी होत असतो त्याची सगळी माहिती उद्धव ठाकरे यांना देत असतो असेही राऊत म्हणाले आहेत. यूपीएबाबत उद्धव ठाकरेंचे काय म्हणणे आहे. त्याबाबत ते लवकरच सांगतील. यामध्ये लपवण्यासारखे काही नाही. आमच्यासोबत काही घटक आणि राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस सहभागी आहे. महाराष्ट्रात देशातील साहसी प्रयोग सुरु आहे तो यशस्वी सुरु आहे. त्यावर राहुल गांधी यांनी देखील समाधान व्यक्त केल्याचे राऊत म्हणाले.

राहुल गांधींच्या भेटीवर शरद पवारांना शंका नाही

काँग्रेस नेत्यांच्या भेटीवर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांना शंका नाही. यासंदर्भात शरद पवार यांच्याशीही चर्चा झाली आहे. राहुल गांधी यांच्या भेटीपुर्वी देखील पवारांसोबत चर्चा केली आहे. आम्ही एकत्र आहोत नात्या गोत्यांविषयी कोणाच्याही मनात संशय असू नये म्हणूनच महाराष्ट्रात सरकार सुरळीतपणे सुरु असल्याचे संजय राऊतांनी सांगितले.

- Advertisement -

यूपीए मजबूत व्हावी

प्रियांका गांधी काँग्रेसच्या प्रमुख नेत्या आहेत त्या निर्णय प्रकियेतही सहभागी आहेत. त्यांना माझ्यासोबत चर्चा करायची असेल तर आमचे कर्तव्य आहे की, त्यांच्यासोबत चर्चा करावी. युपीए अधिक मजबूत व्हायला पाहिजे हे सगळ्यांचे म्हणणे आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा चांगल्या भावनेने म्हटलं आहे की, चांगली आघाडी मोठी, आघाडी उभी राहिली पाहिजे. लढाईमध्ये आपण मोठी लढाई लढतो तेव्हा गट, तट वेगळी आघाडी, सेकंड आघाडी, तिसरी आघाडी असे न करता जी आघाडी आहे ती मजबूत करायला हवी असे संजय राऊत म्हणाले. कुठेही देशभरात एकच आघाडी व्हायला हवी अशीच भूमिका शरद पवार यांची असून ती योग्यच असल्याचे राऊत यांनी सांगितले.

राहूल गांधी यांनी पुढाकार घेतला याचा अर्थ शरद पवार यांनी घेतला असे होत नाही. शरद पवार यांच्या उंचीचा नेता राजकारणात आता नाही आहे. आजही देशातील सर्व प्रमुख राजकीय पक्ष, सत्तेत असलेले किंवा नसलेले त्यांचे नेते शरद पवारांना आदर मान देतात ते आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. राहुल गांधींच्या चर्चेमध्ये हा विषय आला होता असे संजय राऊत म्हणाले.


हेही वाचा :  काँग्रेसशिवाय कोणताही फ्रंट अस्तित्वात येणार नाही

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -