Saturday, April 10, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी पवार-शहांच्या भेटीचा नेमका सस्पेंस काय? संजय राऊतांचा सवाल

पवार-शहांच्या भेटीचा नेमका सस्पेंस काय? संजय राऊतांचा सवाल

'गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये भेट झाली असेल तरी त्यात चुकीचे काय?', असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

Related Story

- Advertisement -

‘केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेणे यात काही गैर नाही. गृहमंत्र्यांना कोणीही भेटू शकते. त्यामुळे गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये भेट झाली असेल तरी त्यात चुकीचे काय? त्यांच्या भेटीचा नेमका सस्पेंस काय?’,असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. तसेच ‘बंद खोलीत झालेल्या चर्चानंतर बाहेर येतातच’, असा टोलाही गृहमंत्री अमित शहा यांना लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी अहमदाबादमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकारणात एकच खळबळ उडाली. अहमदाबादमधील एका फार्म हाऊसवर बंद दाराआड झालेल्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या. मात्र, या चर्चांवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत पूर्णविराम दिला आहे.

- Advertisement -

काय म्हणाले राऊत?

राजकारणात कुठलीही बैठक गुप्त नसते. तसेच काही कामानिमित्त भेट घेतल्यास चुकीचे काय? त्यामुळे विरोधकांना चुकीचे चित्र देशपातळीवर तयार करण्याची संधी देता कामा नये. गृहमंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपापल्या पदावर योग्य काम करत आहेत. दरम्यान, मागील काही दिवसातील घडामोडींमुळे महाराष्ट्राची देशात बदनामी झाली. महाराष्ट्राची देशपातळीवर मोठी प्रतिष्ठा आहे. विशेष म्हणजे विरोधकांनी आरोपांची उधळण करणे थांबवावे. स्वत: बेरंग आहेत. त्यामुळे ते रंग काय उधळणार ते माहितीच आहे’, असे म्हणत संजय राऊत यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

- Advertisement -

‘पवार साहेब-अमित शहा यांची भेट झाली नाही. ही काळ्या दगडावराची पांढरी रेघ आहे. तरी देखील आमचे काही पत्रकार मंडळी रंग उधळत आहेत. चघळायला काही नसले कि अफवेभवती दोन दिवस घालवता येतात. हेच या बातमीच्या रूपाने सिद्ध होतं. माझ्या सर्व पत्रकार बांधवांना होळीच्या शुभेच्छा! बुरा ना मानो होली है’, असे प्रत्युत्तर देत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आरोप खोडून लावले आहेत.


हेही वाचा – राज्यात कोरोना बाधित रुग्णांचा नवा उच्चांक, रूग्णसंख्येचा ४० हजारांचा नवा रेकॉर्ड


 

- Advertisement -