घरताज्या घडामोडीशरद पवारांची प्रकृत्ती स्थिर; बुधवारी होणार शस्त्रक्रिया

शरद पवारांची प्रकृत्ती स्थिर; बुधवारी होणार शस्त्रक्रिया

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची तब्येत बिघडली असून सध्या त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची अचानक तब्येत बिघडली आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास त्यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून ३१ मार्चला पवारांवर एन्डोस्कोपीनंतर शस्त्रक्रिया केली जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. तसेच सध्या मिळालेल्या माहितीनुसार; शरद पवार यांची प्रकृती स्थिर आहे. तसेच येत्या ३१ मार्च रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे आजपासूनचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले, असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.

‘राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं निदान करण्यात आलं असून त्यांची प्रकृत्ती स्थिर आहे’. – नवाब मलिक, राष्ट्रवादीचे प्रवक्ते

- Advertisement -

सुप्रिया सुळे यांनी whatsappवर स्टेट्स ठेऊन शरद पवार यांची तब्येत बरी नसल्याची माहिती दिली आहे. ‘बाबांना पित्ताशयाचा त्रास होत आहे. त्यामुळे त्याकडे तातडीने लक्ष देऊन उपचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे १० दिवसांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर ते घरीच विश्रांती घेतील. त्यामुळे त्यांचे आजपासून सुरु होणारे नियोजित कार्यक्रम आणि दौरे पुढील दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आले आहेत. तुम्ही समजून घेतल्याबद्दल धन्यवाद’, असे ट्विट करत माहिती दिली आहे.

- Advertisement -


हेही वाचा – पवार-शहांच्या भेटीचा नेमका सस्पेंस काय? संजय राऊतांचा सवाल


 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -