घरताज्या घडामोडीआक्रमक नेत्यातला हळवा बाप, पूर्वशीच्या पाठवणीला संजय राऊत भावूक

आक्रमक नेत्यातला हळवा बाप, पूर्वशीच्या पाठवणीला संजय राऊत भावूक

Subscribe

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत नेहमीच रोखठोख वक्तव्य आणि आक्रमक भाषा शैलीमुळे ओळखले जातात परंतु गेल्या २ दिवसांपासून महाराष्ट्राला नव्या एका बापाच्या रुपातील संजय राऊत पाहायला मिळाले. मग ते कधी मुलीच्या आग्रहाखातर फोटो काढताना तर कधी नाचताना दिसलं मात्र लेकीच्या लग्नानंतर पाठवणी करताना संजय राऊत काहीसे भावूक झालेले दिसले. या स्थितीतही संजय राऊत आपले अश्रू लपवण्याचा प्रयत्न करत होते परंतु त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावावरुन ते भावूक झाले असल्याचे स्पष्ट दिसलं. शेवटी राजकारणी कितीही आक्रमक असला तरी बाप म्हणून तो हळवा असतो हे खरं आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांची मुलगी पुर्वशीच्या लग्न सोहळ्याचे गेल्या दोन दिवसांपासून फोटो आणि व्हिडिओ चांगलेच व्हायरल झाले आहेत. यामध्ये रोखठोक वक्तव्य करणारे आणि कडक शिस्तीचे संजय राऊत मवाळ स्वभावाचे दिसले. लगीनघाईत संजय राऊत व्यस्त होते. त्यांचा खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत डान्स करत असल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. राऊत लग्न सराईत पहिल्या दिवशी आनंदाने पाहुण्यांचा पाहुणचार करत होते. डान्स करत होते. मुलगीसोबत फोटो काढत होते. परंतु दुसऱ्या दिवशी मुलीच्या लग्नानंतर पाठवणी करण्याचा क्षण आला.

- Advertisement -

कन्यादान करताना बाप हा भावूक होतोच त्यापेक्षा जास्त मुलीच्या पाठवणीवेळी होतो. मुलीच्या पाठवणीवेळी राऊत कुटुंबीय भावूक झाले होते. राऊतांच्या पत्नी आणि पुर्वशीच्या मातोश्रींना अश्रू अनावर झाले होते. हे पाहून संजय राऊत देखील भावूक झाले आणि कंठ दाटून आला होता. परंतु संजय राऊत यांनी स्वतःला सावरुन मुलीच्या पाठीवर हात ठेवला. नेहमीच आक्रमकपणे वक्तव्य आणि रोखठोक बोलणारे संजय राऊत भावूक झाल्याचे महाराष्ट्राने पाहिले आहेत. शेवटी मुलीच्या लग्नावेळी कोणताही बाप हा जास्त भावूक होत असतोच. मग त्यातून राजकारणीही सुटले नाहीत.


हेही वाचा :  संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांचा डान्स होतोय व्हायरल

- Advertisement -

 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -