घरताज्या घडामोडीआमची वायनरी असेल तर सोमय्यांनी ताब्यात घ्यावी, शहांचा मुलगा ढोकळा विकतो का?,...

आमची वायनरी असेल तर सोमय्यांनी ताब्यात घ्यावी, शहांचा मुलगा ढोकळा विकतो का?, संजय राऊतांचा पलटवार

Subscribe

तुमची मुल काय करतात ते पाहा, आमची मुलं ड्रग्स विकत नाहीत किंवा तुमच्या प्रमाणे आमची मुलं ड्रग्सच्या आहारी गेले नाहीत असा घणाघात राऊतांनी भाजप नेत्यावंर केला आहे.

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यात आणि भाजप माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. संजय राऊत यांची वाईन उद्योगामध्ये गुंतवणूक असून त्यांचा करार झाला असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. परंतु जर वाईन उद्योगात गुंतवणूक असेल तर सोमय्यांनी वायनरी ताब्यात घ्यावी असा पलटवार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच व्यवसायावरुन संजय राऊतांनी सोमय्या आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सोमय्यांचा मुलगा चणे शेंगदाणे आणि शहांचा मुलगा ढोकळा विकतो कसा असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी वाईन उद्योपतीसोबत करार केल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. यावर संजय राऊतांनी भूमिका मांडली असून ते म्हणाले की, आमची एखादी वायनरी असेल तर सोमय्यांनी ताब्यात घ्यावी आणि चालवावी. तसेच एखाद्या कुटुंबातील व्यक्ती काही व्यवसाय करत असेल तर त्यात गुन्हा आहे का? कुणीही असेल, कोणी व्यवसाय करत असेल. चोऱ्यामाऱ्या करणं, बँकांना लुबाडणं यापेक्षा कष्ट करणं काम करणं श्रम करणं चांगलं आहे. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनीसुद्धा फोन केला होता ते सुद्धा हासत होते असे संजय राऊत म्हणाले. जर आमची वायनरी असेल तर सोमय्यांच्या नावावार करुन देऊ असे संजय राऊत म्हणाले आहेत.

- Advertisement -

अमित शहांचा मुलगा ढोकळा विकतो का?

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही हल्लाबोल केला आहे. राऊत म्हणाले उद्योगपती अशोक गर्ग माझे मित्र आहेत. एखाद्या कंपनीत संचालक असणं यामध्ये गुन्हा काय आहे? किरीट सोमय्यांचा मुलगा चणे शेंगदाणे विकतो का? भाजप नेत्याची मुलं केळी विकतात का? अमित शाहांचा मुलगा केळी, सफरचंद, ढोकळा विकतो का? कुणाची मुले काय विकतात हा व्यक्तिगत प्रश्न असल्याचे राऊत म्हणाले आहेत.

आमची मुले ड्रग्सच्या आहारी गेले नाहीत

ड्रग्सवरुनही संजय राऊत यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांची मुले मुंबईच्या रस्त्यावर स्टॉल किंवा एखादा डान्सबार टाकणार आहेत का? भाजपने हे धंदे बंद करावेत. भाजप नेत्यांकडून घाणेरडे राजकारण सुरु आहे. परंतु त्यांच्यावर ते उलटल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणाला संस्कार आणि परंपरा आहे. तुमची मुल काय करतात ते पाहा, आमची मुलं ड्रग्स विकत नाहीत किंवा तुमच्या प्रमाणे आमची मुलं ड्रग्सच्या आहारी गेले नाहीत असा घणाघात राऊतांनी भाजप नेत्यावंर केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : राऊतांचा वाइन उद्योगाशी संबंध काय? ठाकरे सरकारचे कारनामे फक्त पैसे गोळा करणे- किरीट सोमय्या

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -