घरमहाराष्ट्र'सोमय्यांची मेहूल चोक्सीसोबत खास दोस्ती, त्याच्याकडे हे बाप-बेटे पळून गेले का?'; राऊतांचा...

‘सोमय्यांची मेहूल चोक्सीसोबत खास दोस्ती, त्याच्याकडे हे बाप-बेटे पळून गेले का?’; राऊतांचा सवाल

Subscribe

आयएनएस विक्रांत निधी घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या सध्या नॉट रिचेबल आहेत. यावरुन शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी सोमय्या पिता-पुत्र फरार असल्याचा दावा केला आहे. किरीट सोमय्या यांची मेहुल चोक्सी सोबत जुनी मैत्री आहे, त्याच्याकडे हे दोघे पळून गेले का? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

संजय राऊत यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी “माझ्या माहितीप्रमाणे विक्रांत वाचवा, सेव्ह विक्रांतच्या नावाखाली कोट्यवधी रुपये गोळा केले. त्या पैशाचा गैरवापर झाला. योग्य ठिकाणी ते पैसे जमा केले नाही. राजभवनात जमा केले नाही. १०-१२ वर्ष झाली तरी पैशाचा हिशोब दिला नाही. हा जो आर्थिक गुन्हा दाखल झाला ट्रॉम्बे पोलीस स्टेशनमध्ये तो आता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाला आहे.. कारण या गुन्ह्याची व्याप्ती खूप मोठी झाली आहे. कोट्यवधी रुपयाचा गैरव्यवहार आहे. महाराष्ट्रभर पैसे गोळा केलेत. महाराष्ट्राबाहेरुन देशाच्या, बाहेरुन यांनी पैसे गोळा केलेत. त्यामुळे तो तपास आता त्या पद्धतीने सुरु व्हायला हवा,”असं राऊत म्हणाले.

- Advertisement -

“किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांचे संबंध पीएमसी बँक घोटाळ्यातील मुख्य सुत्रधार राकेश वाधवान सोबत होते हे आपण सिद्ध केले आहे. यांची एक माफीया टोळी आहे, ब्लॅकमेल करुन बिल्डरांना लूटत होते. वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरुन…त्यातलं एक आयएनएस प्रकरण समोर आणलं आहे. पण हे दोन महाशय आहेत कुठे? हे फरार झाले आहेत. अटकपूर्व जामिनासाठी ते दिल्लीतून दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी काही खोटी कागदपत्रं तयार केल्याची माहिती माझ्याकडे आहे. आम्ही आधीच पैसे कसे जमा केले अशी कागदपत्र तयार करत आहेत. पण हे खोटं आहे. न्यायालयात सत्याचा विजय आहे. आमची न्यायालये दबावाखाली जाणार नाहीत. फक्त हे दोन लफंगे कुठे आहेत ते पोलिसांना तात्काळ शोधावं लागेल. कुठे पळून गेलेत? देशाबाहर पळून जायची भिती मल वाटतेय. त्यामुळे या दोघांच्या विरोधात लूक आऊट नोटीस ताबडतोब काढली पाहिजे,” अशी मागणी राऊत यांनी केली.

“मेहूल चोक्सी आणि किरीट सोमय्याची फार जुनी दोस्ती आहे. मेहूल चोक्सी जिथे लपला आहे, तिथे तर हा माणूस गेलेला नाही ना? हे जाऊ शकतात, हे घाबरलेले आहेत. भाजपने या संपूर्ण घोटाळ्यावर आणि किरीट सोमय्याच्या फरार होण्यावर आतापर्यंत अधिकृत वक्तव्य का केलं नाही. ते करणं गरजेचं आहे, की विक्रांत घोटाळ्याला भाजपचं अधिकृत समर्थन आहे,” असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.

- Advertisement -

“कालपासून राजभवनामध्ये किरीट सोमय्याच्या माफिया टोळीची माणसं जात आहेत. जुन्या तारखेचे कागदपत्र तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत, ही माझी पक्की माहिती आहे. राजभवनाने या भानगडीत पडू नये. राजभवनाने देशविरोधी कृत्यात सामील होऊ नये. हा घोटाळा मोठा आहे. यातून अनेक गोष्टी समोर येणार आहेत,” असं संजय राऊत म्हणाले.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -