घरमहाराष्ट्रSanjay Raut : मोदी-शहांनी कापले फडणवीसांचे पंख, संजय राऊतांचा दावा

Sanjay Raut : मोदी-शहांनी कापले फडणवीसांचे पंख, संजय राऊतांचा दावा

Subscribe

2019 नंतर देवेंद्र फडणवीसांना दिल्लीत जाऊन काम करायचे होतेय. परंतु, त्यांचे हे स्वप्न मोदी-शहांना आवडले नाही आणि म्हणूनच त्या दोघांनी मिळून त्यांचे पंख कापले, असा नवा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला आहे.

मुंबई : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना पंतप्रधान बनण्याचे स्वप्न पडू लागले होते. त्यामुळे त्यांना 2019 नंतर दिल्लीत जाऊन काम करायचे होतेय. परंतु, त्यांचे हे स्वप्न मोदी-शहांना आवडले नाही आणि म्हणूनच त्या दोघांनी मिळून त्यांचे पंख कापले, असा नवा दावा आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी 2019 ला युती का तुटली? याबाबतचे खरे कारण सांगत मोठा गौप्यस्फोट केला. पण त्यांच्या या गौप्यस्फोटाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टीका केली आणि त्यांच्या या टीकेला आता राऊतांकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. (Sanjay Raut sensational claim about Devendra Fadnavis)

आज रविवारी (ता. 21 एप्रिल) प्रसार माध्यमांसमोर खासदार संजय राऊत म्हणाले की, प्रत्येक वेडा माणूस हेच सांगतो की, मी वेडा नाही. प्रत्येक गुन्हेगार हेच सांगतो की, मी गुन्हा केला नाही. हा मानवी स्वभाव असतो. फडणवीस याला अपवाद नाहीत. उद्धव ठाकरे यांनी जे सागंतिले ते शंभर टक्के सत्य आहे. उद्धव ठाकरेंशी फडणवीसांची चर्चा झाली तेव्हा आमचे संबंध चांगले होते. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी बसवून मी दिल्लीत जाऊन मी अर्थमंत्री, गृहमंत्री आणि पंतप्रधान होईल, असे त्यांचे स्वप्न होते, असा दावा राऊतांकडूनही करण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Sanjay Raut : आम्ही काय बोलतो हे काँग्रेसला कळत नाही, राऊतांचा नाना पटोलेंना टोला

तसेच, स्वप्न बाळगायला काहीच हरकत नाही. महाराष्ट्राच्या नेत्याला असे नेतृत्व करण्याची संधी मिळणार असेल तर आम्ही नक्कीच त्याच्या पाठिशी उभे राहतो. पण त्यांचे हे स्वप्न बहुधा मोदी-शाहांना आवडले नाही. म्हणूनच फडणवीस यांच्या स्वप्नांचे पंख कापण्यात आले आणि त्यांना महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री करण्यात आले. जे काही राजकारण आम्हाला कळते, त्यातून हे दिसते. पण इतके मोठे स्वप्न फडणवीस पाहायला लागल्यानंतर मोदी-शाहांनी निर्णय घेऊन एकनाथ शिंदे या ज्युनियर नेत्याच्या हाताखाली त्यांना काम करायला लावले. यालाच मोदी-शाहांची रणनीती म्हणतात, असा सणसणीत टोला खासदार संजय राऊत यांच्याकडून लगावण्यात आला.

- Advertisement -

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी 2019 मधील घटनेचा गौप्यस्फोट केल्यानंतर आता पुन्हा एकदा भाजपा वि. शिवसेना ठाकरे गट अशा नव्या वादाला सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरेंनी गौप्यस्फोट केल्यानंतर त्यांना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनविण्याची भाषा वापरताना उद्धव ठाकरेंना वेड लागले असेल, पण मला वेड लागलेले नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे. त्यांच्या या टीकेला राऊतांनीही चोख प्रत्युत्तर दिले आहे.

हेही वाचा… Lok Sabha Election 2024 : हिंगोलीच्या सभेतून दानवेंचा मोदी-शहांवर घणाघाती हल्ला, म्हणाले…


Edited By : Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -