घरताज्या घडामोडीबेळगावमधील मराठी भाषिकांची आकडेवारी लवपण्याचा प्रयत्न - संजय राऊत

बेळगावमधील मराठी भाषिकांची आकडेवारी लवपण्याचा प्रयत्न – संजय राऊत

Subscribe

कर्नाटक सरकारने सीमाभागाचे कानडीकरण केले

बेळगावात मराठीजनांच्या (Belgaum Marathi speakers ) आकड्यांवरुन शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कर्नाटक सरकारवर हल्लाबोल केला आहे.  बेळगावमधील मराठी भाषिकांची आकडेवारी लवपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप  संजय राऊत यांनी केला आहे. कानडी राज्यशाहीवर सरकार गप्प का? असे म्हणत संजय राऊत यांनी सरकारची कानउडणी केली आहे.

बेळगावमध्ये सर्वात जास्त मते मराठी उमेदवारांना मिळाली आहेत. बेळगावमधील मराठी भाषिकांची आकडेवारी लवपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.  कर्नाटकला उत्तर देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने भूमिका घेणे गरजेचे आहे,असे म्हणत बेळगावात मराठीजनांचा आकडा कमी दाखवणाऱ्या कर्नाटक सरकारवर हल्लाबोल बोल केला आहे.

- Advertisement -

कर्नाटक मध्ये १५ टक्के मराठी भाषिक असून ते अल्पसंख्याक आहे असे कर्नाटक सरकारने म्हटले आहे. सीमा भागात ६० ते ६५ टक्के मराठी बांधव राहतात मात्र कर्नाटक सरकारने सीमाभागाचे कानडीकरण केले आहे. मराठी टक्का राजकीय स्वार्थासाठी कमी करण्याचा डाव कर्नाटक सरकारचा आहे,अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

कर्नाटकमधे मराठी भाषिकांची गळचेपी होत आहे. त्यामुळे सीमा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी नेमलेल्या दोन मंत्र्यांनी भूमिका घेणे गरजेचे आहे. राज्य सरकार या बाबत का गप्प आहे हे कळत नाही. एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ हे दोन मंत्री आहेत. हे समनव्यक आहेत या दोन्ही मंत्र्यानी तिथे जाऊन या संदर्भात चर्चा करायला हवी. महाराष्ट्र सरकार यावर का गप्प आहे ? असा सवाल करत मी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

ममता बॅनर्जी विक्रमी मताधिक्यांनी विजयी होतील

ममता बॅनर्जी या भवानीपूरमधून निवडणूका लढवत आहेत. भवानीपूर हा ममता यांचा परंपरातंर्गत गड आहे. मागच्या निवडणुकीत त्या दुसऱ्या मतदार संघात आव्हान स्विकारुन उभ्या राहिल्या होत्या. त्यासंदर्भातील याचिका न्यायालयात आहे.
भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जी विक्रमी मताधिक्यांनी विजयी होतील याची सर्व देशाला खात्री आहे, असे म्हणत संजय राऊतांनी ममता बॅनर्जींना शुभेच्छा दिल्या आहेत.


हेही वाचा – शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना भाजपाकडून देगलूर विधानसभेसाठी उमेदवारी

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -