घरमहाराष्ट्रमहेश मांजरेकरांचे चित्रपटसृष्टीत योगदान काय? मांजरेकरांच्या नव्या चित्रपटावर आव्हाडांचा संताप

महेश मांजरेकरांचे चित्रपटसृष्टीत योगदान काय? मांजरेकरांच्या नव्या चित्रपटावर आव्हाडांचा संताप

Subscribe

मराठीतील प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी २ ऑक्टोबर गांधी जयंतीच्या निमित्ताने आगामी चित्रपटाची घोषणा केली. महात्मा गांधी य़ांचे मारेकरी नथुराम गोडसेवर आधारित हा चित्रपट आहे. परंतु या चित्रपटावरून आता राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. महात्मा गांधी यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त या चित्रपटाचा टीझर मांजरेकरांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. मात्र या चित्रपटाच्या घोषणेपासूनचं राज्यभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यामुळे आता नव्या वादाला तोंड फडण्याची शक्यता आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील महेश मांजरेकरांच्या नव्या चित्रपटाविरोधात संपात व्यक्त केला आहे.

- Advertisement -

जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत महेश मांजरेकर कोण आहेत? त्यांचे भारतीय चित्रपटसृष्टीत योगदान काय? असे प्रश्न उपस्थित करत चित्रपटावर आपला आक्षेप नोंदवला आहे. लोकांचे लक्ष वेधण्यासाठी केलंल नाटक असल्याचा आरोपही आव्हाडांनी केला आहे. २०२२ मध्ये या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahesh Manjrekar (@maheshmanjrekar)

- Advertisement -

नुकतंच महेश मांजरेकरांनी या सिनेमाचा टीझर रिलीज करत म्हटले की, वाढदिवसाच्या सर्वात घातक शुभेच्छा! यापूर्वी कोणीही सांगण्याचे धाडस केले नाही अशा कथेच्या साक्षीसाठी सज्ज व्हा! संदीप सिंग, राज शांडिल्य आणि महेश मांजरेकर यांनी महात्मा गांधींच्या १५२ व्या जयंतीनिमित्त “गोडसे” सिनेमाची घोषणा केली आहे”.

यावर मांजरेकरांनी पुढे म्हटले की, “नथुराम गोडसेची गोष्ट नेहमीच माझ्या ह्रदयाच्या जवळ राहिलीय. अशा पद्धतीच्या चित्रपटाला पाठिंबा देण्यासाठी खूप धाडस लागतं. मी नेहमीच कठीण विषय आणि गोष्ट सांगताना कोणतीही तडजोड करु नये यावर विश्वास ठेवला आहे. महात्मा गांधींचा मारेकरी याव्यतिरिक्त लोकांना गोडसेबद्दल जास्त माहिती नाही. ही गोष्ट सांगताना आम्हाला कोणाचीही बाजू मांडायची नाहीये किंवा विरोधात बोलायचं नाहीये. कोण चूक कोण बरोबर हा निर्णय आम्ही प्रेक्षकांवर सोडणार आहोत”. परंतु या चित्रपटावरून आता राजकीय नेत्यांकडूनही विविध प्रतिक्रिया येत आहे.


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -