घरमहाराष्ट्रशिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना भाजपाकडून देगलूर विधानसभेसाठी उमेदवारी

शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना भाजपाकडून देगलूर विधानसभेसाठी उमेदवारी

Subscribe

नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलोली विधानसभेची पोटनिवडणूक ऑक्टोबरमध्ये होणार असल्याचे जाहीर झाले आहे. अशातच आता देगलूरमधील शिवसेनेचे नाराज नेते माजी आमदार सुभाष साबणे हे भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे नांदेडमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. भाजपनं देगलूर बिलोली जागेसाठी सुभाष साबणे यांना उमेदवारी देखील जाहीर केली आहे. साबणेंच्या भाजपा प्रवेशामुळे आता ही निवडणूक चांगलीच चुरशीची होणार असल्याचे सांगितले जात आहे. नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेत साबणे शिवसेनेचे शिवबंधन सोडत भाजपचं कमळ हातात घेण्याचं निश्चित झाले आहे.

काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले होते. ते नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. त्यांच्या निधनानंतर देगलूर बिलोली विधानसभेची जागा रिक्त होती. आता याच जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसाठी आता ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. देगलूरचे माजी आमदार राहिलेले सुभाष साबणे यांनी नुकतीच देवेंद्र फडणवीस यांची नरसी गायगाव येथे भेट घेतली. या भेटीदरम्यान देवेंद्र फडणवीस आणि सुभाष साबणे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती आहे. याचवेळी काँग्रेसचे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापुरकर यांच्या देगलूर बिलोली मतदारसंघात पोट निवडणूकीसाठी भाजपामधून सुभाष साबणे यांना भाजपामधून उमेदवारी देण्यासंदर्भातही चर्चा झाल्य़ाची माहिती समोर आली आहे. यानंतर आता सुभाष साबणे यांनी भाजपात प्रवेश केला आहे.

- Advertisement -
bjp announced candidate former shivsena mla subhash sabane deglur biloli assembly by polls in maharashtra

नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलोली विधानसभेची पोटनिवडणूक ऑक्टोबरमध्ये होणार असल्याचे जाहीर झाले आहे

सध्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मराठवाडा दौऱ्यावर आहेत. मराठवाड्यातील पुरामुळे नुकसान झालेल्या भागाची  ते पाहणी करत आहे. याच दरम्यान सुभाष साबणे यांनी फडणवीसांची भेट घेतली होती. यावेळी साबने यांनी नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या त्रासामुळे आपण शिवसेना पक्ष सोडत असल्याचे जाहीर केले, तसेच आज ते भाजपामध्ये अधिकृतरित्या प्रवेश करणार असल्याचे निश्चित आहे. देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडूनही सुभाष साबणे यांना उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे.

कोण आहेत सुभाष साबणे? 

सुभाष साबणे हे शिवसेनेचे जुन्या पिढीतील नेते म्हणून ओळखले जातात. साबणे दोन वेळा विधासभेवर आमदार म्हणून निवडून गेले आहेत. त्यामुळे मुखेड आणि देगलूर विधानसभा मतदारसंघात प्रतिनिधीत्व केलं आहे. २०१९ साली ते देगलूरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले मात्र रावसाहेब अंतापूरकरांनी त्यांचा पराभव केला.


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -